Inflation : महागाई, दडपशाहीविरोधात काँग्रेसची निदर्शने

महागाई, जीएसटी आणि विरोधकांवर सुरू असलेल्या दडपशाहीविरोधात काँग्रेसने मुंबईत जोरदार निदर्शने केली.
Inflation
InflationAgrowon

मुंबई : महागाई (Inflation), जीएसटी (GST) आणि विरोधकांवर सुरू असलेल्या दडपशाहीविरोधात काँग्रेसने मुंबईत जोरदार निदर्शने (Congress Protest) केली. राजभवनाला (Rajbhavan) घेराव घालण्याचा इशारा दिल्याने मंत्रालयापासून मलबारहिलच्या परिसरापर्यंत मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांसह कार्यकर्त्यांची धरपकड केली.

Inflation
Inflation: शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं तरच महागाईला लागेल 'ब्रेक'

महागाई, जीएसटी आणि दडपशाहीचा आरोप करत काँग्रेसने देशभर आंदोलन पुकारले होते. दरम्यान, दिल्लीतील विजय चौकातून काँग्रेस नेते राहुल गांधी यांना अटक केल्यानंतर मुंबईतही कार्यकर्ते आक्रमक झाले. भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात घोषणा देत जोरदार निदर्शने केली. त्यानंतर विधानभवनात बैठकीसाठी आलेल्या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांना पोलिसांनी तेथेच अडवले. या वेळी पोलिसांशी वादावादी झाली.

Inflation
Inflation : महागाईच्या विरोधात विरोधकांची निदर्शने

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, ‘‘जनता महागाईने त्रस्त असताना केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी लावून गोरगरिबांच्या तोंडातला घास हिरावून घेतला. केंद्र सरकारला मात्र महागाई दिसत नाही. बेरोजगारी वाढली असून अग्निपथ योजना आणून तरुणांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. जनतेच्या या प्रश्नांवर जाब विचारण्यासाठी राजभवनला घेराव घालण्याचे काँग्रेसने घोषित केले असता राज्यातील सरकारने रात्रीपासूनच काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांची धरपकड केली. विधान भवनातून आंदोलनासाठी जात असतानाच काँग्रेस नेत्यांना पोलिसांनी अटक केली. सरकारने दंडेलशाहीच्या जोरावर आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला, पण अशा कारवायांना घाबरत नाही, जनतेच्या प्रश्नावर संघर्ष करतच राहू.’’

राजभवन घेराव व जेलभरो आंदोलन पुकारल्याने पोलिसांनी आधीच मुंबईच्या वेगवेगळ्या भागातून काँग्रेस नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना अटक केली. पोलिसांनी गुरुवारी रात्रीपासूनच काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची धरपकड केली होती. मुंबई आणि परिसरातून १० हजाराहून अधिक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.

कॉंग्रेस नेत्यांना अटक

विधानभवनातून आंदोलनस्थळी निघालेल्या नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, वर्षा गायकवाड, चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, अमर राजूरकर यांना अटक करण्यात आली. तर मलबार हिल परिसरातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, नितीन राऊत, अस्लम शेख, भाई जगताप, अतुल लोंढे, राजेश शर्मा यांना अटक केली.

बसची तपासणी; चाकरमान्यांना त्रास

राजभवानाला घेराव घालण्याचा इशारा दिल्याने मलबार हिलकडे जाणाऱ्या सर्व बसेच आणि वाहने थांबवून त्यांची तपासणी पोलिस करत होते. नोकरीवर जाण्याच्या वेळीच ही तपासणी सुरू असल्याने अनेकांनी पोलिसांशी हुज्जत घातली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com