Maharashtra politics : सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीने काँग्रेसची कोंडी

सत्यजित हे काँग्रेसच्या संसदीय समितीचे सदस्य व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे भाचे आहेत. पक्षाने आमदार डॉ. तांबे यांची उमेदवारी जाहीर केली होती.
Maharashtra politics
Maharashtra politicsAgrowon

नाशिक : नाशिक पदवीधर मतदारसंघातून तीन टर्म विधानपरिषदेचे प्रतिनिधित्व करणारे आमदार डॉ. सुधीर तांबे (MLA Dr. Sudhir Tambe) हे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी येणार होते. मात्र अर्ज भरतेवेळी त्यात ट्विस्ट पाहायला मिळाला.

काँग्रेसने त्यांची उमेदवारी जाहीर केली होती. परंतु अखेरच्या क्षणी त्यांनी थांबण्याचा निर्णय घेत मुलगा सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यास उमेदवारीकरिता पाठिंबा दिला.

सत्यजित यांनी काँग्रेस व अपक्ष असे दोन्ही अर्ज भरले खरे, मात्र पक्षाचा एबी फॉर्म नसल्याने अपक्ष उमेदवार म्हणून समोर आले आहेत. त्यामुळे आता काँग्रेसची कोंडी (National Congress) झाली आहे.

सत्यजित हे काँग्रेसच्या संसदीय समितीचे सदस्य व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे भाचे आहेत. पक्षाने आमदार डॉ. तांबे यांची उमेदवारी जाहीर केली होती.

मात्र पुत्र सत्यजित यांनी अखेरच्या क्षणापर्यंत स्वतःची दावेदारी कायम ठेवली. त्यातच भारतीय जनता पक्षाने त्यांना जाळ्यात खेचण्याची तयारी केल्याने काँग्रेसच्या गटातील निष्ठावंत असलेले थोरात व तांबे कुटुंबीयांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.

या खेळीमागे भारतीय जनता पक्ष असल्याचे सांगण्यात येते. सत्यजित आणि देवेंद्र फडणवीस यांचे राजकीय संबंध जुळल्याचे समजते.

Maharashtra politics
Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षावरील सलग सुनावणी १४ फेब्रुवारीपासून

‘सत्यजितकडे 'व्हीजन'’

‘‘मी अपक्ष अर्ज भरला असला तरी मी महाविकास आघाडीचा उमेदवार आहे. वेळेवर काँग्रेसकडून एबी फॉर्म न मिळाल्याने अपक्ष म्हणून अर्ज भरावा लागला.

तरुणांना संधी मिळावी म्हणून मी या निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. सत्यजित तांबे यांच्यासारख्या नव्या नेतृत्वाला संधी मिळण्याची गरज आहे.

काँग्रेसमध्ये सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीला विरोध नाही. सत्यजितकडे 'व्हीजन' आहे, ’’असे डॉ. सुधीर तांबे म्हणाले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com