पानवेली, पानपिंपरी, औषधी वनस्पतींचे होणार संवर्धन

सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये बारी समाजाकडून मोठ्या प्रमाणावर पानवेली, पानपिंपरी व औषधी वनस्पतींची शेती होते. त्यामध्ये खायची पाने (विडा), औषधी गुणयुक्त असलेली पानपिंपरी तसेच सफेद मुसळी व इतर औषधी वनस्पतींचा समावेश आहे.
Medicinal Plants
Medicinal PlantsAgrowon

अमरावती : सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये होणाऱ्या पानवेली (Panveli), पानपिंपरी (Panpimpari) व औषधी वनस्पतींचे (Medicinal Plants) अस्तित्व कायम राहावे, यासाठी शासनाने अमरावती विभागीय पानवेली, पानपिंपरी, औषधी उत्पादक शेतकरी विकास अभियान समितीस मान्यता दिली आहे. देशातील ही अशा प्रकारची पहिली आणि एकमेव समिती आहे. (Conservation Of Medicinal Plant)

Medicinal Plants
किसान सभा, आरोग्य उपकेंद्राच्या माध्यमातून देणार गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा

सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये बारी समाजाकडून मोठ्या प्रमाणावर पानवेली, पानपिंपरी व औषधी वनस्पतींची शेती होते. त्यामध्ये खायची पाने (विडा), औषधी गुणयुक्त असलेली पानपिंपरी तसेच सफेद मुसळी व इतर औषधी वनस्पतींचा समावेश आहे. अकोट (अकोला) अंजनगाव सुर्जी, अचलपूर (अमरावती) आणि बुलडाणा जिल्ह्याचा काही भाग अशा अमरावती विभागातील तीन जिल्ह्यांमध्ये या पिकांचे पारंपारिक पद्धतीने व्यवस्थापन होते.

Medicinal Plants
आरोग्यदायी विड्याचे पान

मात्र गेल्या काही वर्षांत ही पारंपरिक पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना कीडरोगांचा मोठा सामना करावा लागत आहे. परिणामी, अनेक शेतकऱ्यांनी हे पीक सोडत पर्यायी पिकांचा अवलंब केला. त्यामुळे वनस्पती पिकांचे अस्तित्व कायम राहावे, यासाठी स्वतंत्र संशोधन समितीचे गठण करावे, या समितीने सुचवलेल्या शिफारशींची अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी शेतकऱ्यांची होती. त्यानुसार तत्कालीन राज्यमंत्री बच्चू कडू यांनी तत्कालीन कृषी मंत्री दादा भुसे यांच्यासमोर ही बाब मांडली. त्यांनी या समितीस मान्यता दिली.

...यांचा असेल समितीत समावेश

विभागीय आयुक्त, शेतकरी प्रतिनिधी, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे तज्ज्ञ, कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा या समितीत समावेश असेल. त्याद्वारे या भागातील औषधी वनस्पती उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

बारी समाजाचा हा परंपरागत व्यवसाय होता. चाळीस-पन्नास वर्षांपूर्वी या भागात २ हजार एकरावर पानवेली होती. आता मात्र फार थोडे क्षेत्र शिल्लक राहिले आहे. व्यवस्थापन पद्धतीत बदल न केल्यामुळे हे घडले आहे, ही बाब मान्यच करावी लागेल. या समितीमुळे काहीतरी सुधारणा होतील, अशी अपेक्षा आहे.
गजानन धर्मे, वनस्पती उत्पादक, बोर्डी, ता. अकोट, जि. अकोला.
देशातील ही अशा प्रकारची पहिलीच समिती आहे. त्यामुळे या भागातील पिकाच्या संवर्धनास हातभार लागेल. अमरावती, अकोला, बुलडाणा या तीन जिल्ह्यांतील अधीक्षक कृषी अधिकारी सदस्य आहेत. सोबतच विभागीय आयुक्त अध्यक्ष आणि विभागीय कृषी सहसंचालक सचिव राहतील. माझाही या समितीमध्ये सहभाग आहे.
विजयकुमार लाडोळे, कार्ड संस्था, अंजनगावसुर्जी, अमरावती.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com