Sava Millet Crop : अकोल्याच्या फोपसंडीत ‘सावा’ पिकाचे संवर्धन

Millet Crop : तृणधान्य पीक असलेल्या दुर्मिळ ‘सावा’ पिकाचे जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील अतिदुर्गम फोपसंडी गावांत शेतकऱ्यांकडून सवर्ण केले जाणार आहे.
Sava Millet
Sava MilletAgrowon

Nagar News : तृणधान्य पीक असलेल्या दुर्मिळ ‘सावा’ पिकाचे जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील अतिदुर्गम फोपसंडी गावांत शेतकऱ्यांकडून सवर्ण केले जाणार आहे. त्यासाठी येथील २५ शेतकऱ्यांना बियाणे दिले आहे.

यंदा त्यातून सुमारे साडेबारा एकरावर लागवड होणार आहे. त्यामुळे पुढील वर्षासाठी मुबलक बियाणे उपलब्ध होईल. शिवाय आहारातून हद्दपार झालेला सावा पुन्हा दैनंदिन आहारात येणार आहे.

अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात भातक्षेत्रातील ‘सावा’ हे तृणधान्यातील पीक. आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक असलेले हे पीक आदिवासी लोकांच्या दैनंदिन आहारात असायचे. साधारण दहा ते पंधरा वर्षांपूर्वी नाचणी, वरई, राळा, भादुली यासह सावाचे उत्पादन घेतले जायचे. मात्र त्यानंतर हे पीक दुर्मिळ होत गेले.

Sava Millet
Millet Production : चांगला परतावा मिळाल्यास भरडधान्य उत्पादन वाढेल

विक्री व्यवस्थेची अडचण, वन्य प्राण्यांकडून होणारे नुकसान पाहता पाच वर्षांपासून अपवाद वगळता हे पीक घेणेच बंद झाले. आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त अकोले तालुक्यातील हद्दपार होत असलेल्या सावा पिकांचे संवर्धन व्हावे म्हणून स्थानिक पातळीवर बियाणे संवर्धन केलेल्या बियाणे बॅंकातून बियाणे उपलब्ध केले आहे.

Sava Millet
Millet Seed Kit : तृणधान्याचे २९ लाख मिनीकीट बियाणे शेतकऱ्यांना वितरण

त्याचे हरिचंद्रगड अभयारण्य क्षेत्रातील फोपसंडी या दुर्गम गावांतील २५ शेतकऱ्यांना प्रायोगिक तत्त्वावर प्रत्येक २० गुंठे क्षेत्राप्रमाणे साडेबारा एकरावर रोपे करून लागवड केली जाणार आहे. यंदाच्या लागवडीतून पुढील वर्षी ५० क्विंटलपेक्षा अधिक सावाचे उत्पादन होईल, असा अंदाज आहे

आदिवासी भागातील दैनंदिन आहारातील ‘सावा’ हे तृणधान्यातील पीक असून पेरणी बंद झाल्याने ते दुर्मिळ होत आहे. त्यामुळे आम्ही यंदा कृषी विभागाच्या आत्मा अंतर्गत प्रात्यक्षिकांतून संवर्धन करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यासाठी स्थानिक पातळीवर बियाणे उपलब्ध केले.
- बाळनाथ सोनवणे, तालुका समन्वय, ‘आत्मा’, अकोले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com