Ginning Industry : सतत खंडित होणारा वीजपुरवठा वाढवतोय उत्पादन खर्च

जिनिंग उद्योगाच्या कामात अनेकदा खंडित होणारा वीजपुरवठा खोडा घालतो आहे. त्यामुळे उद्योगाच्या एकूण उत्पादन खर्चात मोठी वाढ होत आहे.
Ginning Industry
Ginning IndustryAgrowon

बीड : जिनिंग उद्योगाच्या (Ginning Industry) कामात अनेकदा खंडित होणारा वीजपुरवठा (Power Supply) खोडा घालतो आहे. त्यामुळे उद्योगाच्या एकूण उत्पादन खर्चात मोठी वाढ होत आहे. शिवाय अपेक्षित उत्पादनही घेता येत नसल्याची बाब बीड जिल्हा जिनिंग अँड प्रेसिंग असोसिएशनने (Ginning And Pressing Association) सहकारमंत्री तथा पालकमंत्री अतुल सावे यांच्यासमोर मांडली.

Ginning Industry
Cotton Rate : चीन, पाकिस्तान, अमेरिकेत कापसाचे भाव कसे आहेत?

जिनिंग अँड प्रेसिंग असोसिएशनच्या माहितीनुसार, की बीड जिल्ह्यात शेतीवर आधारित असणारा जिनिंग ऑइल मिल उद्योग विस्तारला आहे. जवळपास ७० ते ८० जिनिंग पैकी ३५ ते ४० जिनिंग आजमितीला कार्यरत आहेत.

मागील काही दिवसापासून जिनिंगसाठी लागणारा विद्युतपुरवठा नियमितपणे केला जात नाही. अनेकदा विद्युतपुरवठा खंडित होत असल्यामुळे उद्योगाच्या एकूण उत्पादन खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

याशिवाय अपेक्षित उत्पादनही जिनिंग उद्योजकांना घेणे शक्य होत नाही. राज्य शासनाच्या वस्त्रोद्योग खात्याकडून तसेच जिल्हा उद्योग केंद्राकडून जिनिंग व्यवसायासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या विद्युत खात्याशी निगडित अनुदान देण्याच्या तरतुदी आहेत. त्या मिळवण्यासाठी बीड जिल्ह्यातील जिनिंग व्यावसायिकांनी विद्युत खात्याकडे पाठपुरावा केला. परंतु वेगवेगळी कारणे सांगून अनुदान दिले जात नाही.

Ginning Industry
Cotton Rate : भारतासह चीन, पाकिस्तानात कापसाचे भाव तेजीत

तरी या संदर्भात तातडीने पावले उचलून शासन स्तरावरून जिनिंग उद्योगाला आधार देण्याची मागणी जिनिंग प्रेसिंग असोसिएशनने केली आहे. असोसिएशनच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व पनन संचालकांशी चर्चा करण्याचे आश्‍वासन श्री. सावे यांनी निवेदनकर्त्यांना दिले.

या वेळी असोसिएशनचे अध्यक्ष अमृत सारडा, सचिव बीबी जाधव, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, अंगद नवले, विनोद पिंगळे, राजेंद्र संचेती, मनोज दुग्गड, बालासाहेब मालपाणी, चेतन झंवर, अजित लदड, पंकज भुतडा आदी उपस्थित होते.

सेस आकारणीचाही मुद्दा ऐरणीवर

जिनिंग अँड प्रेसिंग असोसिएशनच्या माहितीनुसार सीसीआय महामंडळाने खुल्या बाजारातून कापूस खरेदी सुरू केली आहे. महामंडळाने खरेदीसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती सेस ०.५० पैसे व देखभाल निधी ०.०५ पैसे प्रति शेकडा आकारण्या संदर्भात पत्र दिले आहे.

मागील काही वर्षापासून जिनिंग व प्रेसिंग उद्योग अडचणीत असल्यामुळे सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीने सीसीआयला ०.५५ पैसे दराने खरेदीसाठी परवानगी देण्यात यावी. यासाठीही सहकार्याची मागणी सहकार मंत्री अतुल सावे यांच्याकडे बीड जिल्हा जिनिंग प्रेसिंग असोसिएशनने केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com