Rajendra Pawar : बारामतीत ऑलिंपिक दर्जाच्या जलतरण तलावाची उभारणी : राजेंद्र पवार

अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती संस्थेच्या वतीने ऑलिंपिक दर्जाचा जलतरण तलाव नव्याने उभारला आहे. याशिवाय आधुनिक जिम (व्यायामशाळा), योगा आणि फिटनेस सेंटरच्या उभारणीचेही काम पूर्णत्वाला आले आहे.
Rajendra Pawar
Rajendra PawarAgrowon

माळेगाव, ता. बारामती ः अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती संस्थेच्या (Agricultural Developmental Trust Baramati) वतीने ऑलिंपिक दर्जाचा जलतरण तलाव नव्याने उभारला आहे. याशिवाय आधुनिक जिम (व्यायामशाळा), योगा आणि फिटनेस सेंटरच्या उभारणीचेही काम पूर्णत्वाला आले आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्‍घाटन शारदानगर येथे शुक्रवारी (ता.२१) ऑलिंपिक जलतरण खेळाडू वीरधवल खाडे, पॅरालम्पिक जलतरण खेळाडू सुयेश जाधव (Suyash Jadhav) यांच्या हस्ते होणार आहे.

Rajendra Pawar
Ajit Pawar : शेतकऱ्यांना तातडीने मदत करा

याशिवाय विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते अन्न प्रक्रिया उद्योगातून निर्माण केलेल्या प्रोडक्टचे लॉचिंग होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते शरद पवार असणार आहेत, अशी माहिती अॅग्रीकल्चरल ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी दिली.

जलतरण तलाव उद्‍घाटनानिमित्ताने पुणे जिल्हा हौशी जलतरण संघटना आणि अॅग्रिकल्चरल डेव्हल्पमेंट ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय जलतरण स्पर्धांचे आयोजन केले आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील ६५० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला आहे, अशी माहिती संस्थेचे सीईओ नीलेश नलावडे यांनी दिली.

भीमथडी फाउंडेशनच्या अन्न प्रक्रिया उद्योगातून निर्माण झालेल्या प्रकल्पाचे लाँचिंग शुक्रवारी होणार आहे. या प्रकल्पामध्ये पाककृती सुधारणे, प्रयोगशाळेत तपासणी, लेबलिंग आणि पॅकेजिंग, साठवूक आणि वाहतूक, प्रशिक्षण आदी टप्प्यांवर अन्न प्रक्रिया उद्योगामधील सहभागी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे, असे संस्थेचे प्रमुख राजेंद्र पवार, सीईओ नीलेश नलावडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com