Crop Insurance : पीकविमा तक्रारींसाठी संपर्क क्रमांक जाहीर

कृषिमंत्री अब्दुल सत्तार गुरुवारी (ता. २७) परभणी जिल्हा दौऱ्यावर आले असताना जिंतूर तालुक्यात शेतकऱ्यांनी विमा कंपनी प्रतिनिधींकडून देण्यात येणाऱ्या वागणुकीबाबत तक्रारी केल्या होत्या.
Crop Insurance
Crop InsuranceAgrowon

परभणी ः कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) गुरुवारी (ता. २७) परभणी जिल्हा दौऱ्यावर आले असताना जिंतूर तालुक्यात शेतकऱ्यांनी विमा कंपनी प्रतिनिधींकडून देण्यात येणाऱ्या वागणुकीबाबत तक्रारी केल्या होत्या. त्यावर कृषिमंत्री सत्तार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या बैठकीत विमा कंपनी प्रतिनिधी, महसूल विभागाचे अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी यांनी समन्वय ठेवत शेतकऱ्यांच्या अडचणी तत्काळ सोडविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार प्रभारी जिल्हाधिकारी राजेश काटकर (Rajesh Katkar) यांनी संबंधित तालुकास्तरीय अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक जाहीर केले आहेत.

जिल्हाभरात पीकविमा कंपनीची सर्व कार्यालये बंद असल्याचे शेतकऱ्यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. त्याअनुषंगाने तक्रारींचा निपटारा करण्यासाठी पीक विमा कंपनी, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, नायब तहसीलदार यांचे संपर्क क्रमांक जाहीर केले आहेत.

Crop Insurance
Crop Damage Survey : साहेब, पंचनाम्यासाठी पीक पाण्यात ठेऊ का?

विमा कंपनीचे जिल्हा समन्वयक : किशोर वळसे (संपर्क क्रमांक ७२०८९१२०८४) आणि संतोष बेंद्रे, (७०२८२१३५५५) आहेत. तालुका समन्वयक परभणी तालुका ः केशव शेळके (९५०३४९३६५५), जिंतूर ः आकाश अंबलिगे (९५८८४८२७०९), सेलू ः विनोद झाडे (८८३०४११४१५), मानवत ः शुभम कावळे (९५४५९९५४४२), पाथरी ः सूरज लाटे (८४४६३४२१९१), सोनपेठ ः आकाश मोरे (९१४६९२०६१४), गंगाखेड ः अर्जुन मोरे (९७६७४६२२५७), पालम ः राजू खुळे (९७६६०३०१७०), पूर्णा ः सतीश बेद्रे (९३७०१९९८४७) हे प्रतिनिधी आहेत.

तालुका कृषी अधिकारी संपर्क क्रमांक

परभणी ः नित्यानंद काळे (९७६७७००७६८८), जिंतूर ः एस. पी. काळे (९४२२७२५७२७), सेलू ः डी. टी. सामाले (९४२३७७४१३३), मानवत ः पी. एच. कच्छवे (९०९६५९५९९७), पाथरी ः पी. एस. नांदे (९४२३४४२१६०), सोनपेठ ः जी. ए. कोरेवाड (९४२३१७३३६), गंगाखेड ः पी. बी. बनसावडे (७५८८५७१११५), पालम ः ए. जे. देशमुख, पालम (७०५७२३२३०५), पूर्णा ः आर. एच. तांबिले (७२१८६५४७६९).

नायब तहसीलदार संपर्क क्रमांक....

परभणी ः एल. व्ही. खळीकर (८३२९१५०९३५), जिंतूर ओमप्रकाश गौंड (७२७६९९०३५१), सेलू ः प्रशांत थारकर (९५८८८६०७०७६), मानवत ः बी. आर. वटाणे (८८३०६५०८१०), पाथरी ः संदीप साखरे (७७२०९७२४३१), सोनपेठ ः प्रकाश गायकवाड (८२०८९६७८१४), गंगाखेड ः सुनील कांबळे (९०४९८८०७५०), पालम ः आर. एन. पवळे (८६९८१८४१७७), पूर्णा ः के. व्ही. मस्के (८३९०२४७०४९). परभणी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक ०२४५२-२२६४०० आहे. शेतकऱ्यांना पीकविम्याशी संबंधित अडचणी आल्यास वरील विमा कंपनी प्रतिनिधी, तालुका कृषी अधिकारी आणि नायब तहसीलदार यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन काटकर यांनी केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com