Nanded Rain : नांदेडमध्ये पुन्हा संततधार

नांदेड जिल्ह्यात जुलैच्या प्रारंभापासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे सुरुवातीला ३६ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते.
Rain Update
Rain Update Agrowon

नांदेड : तुफान पर्जन्यवृष्टीनंतर (After Heavy Rainfall) दोन दिवस खंड दिलेल्या पावसाने रविवारपासून (ता. १७) पुन्हा संततधार (Continues Rain In Nanded) सुरू केली आहे. हा पाऊस जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत झाल्यामुळे खरिपातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता (Possibility Of Kharif Crop Damage) आहे. सोमवारी सकाळी साडेदहापर्यंत जिल्ह्यात सरासरी ३६.४० मिलिमीटर पावसाची (Rain) नोंद झाली.

Rain Update
नांदेड जिल्ह्यांत सर्वाधिक नुकसान

नांदेड जिल्ह्यात जुलैच्या प्रारंभापासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे सुरुवातीला ३६ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. परंतु यानंतर पावसाने जिल्ह्यात धुमाकूळ घातल्याने नदी-नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला. तसेच सखल भागातील शेतातही पाणी साचले. यामुळे नुकसानीच्या क्षेत्रात वाढ होऊन तब्बल सव्वातीन लाख हेक्टरला बाधा पोचल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यानंतर मागील दोन दिवसापासून पावसाने उघडीत दिल्याने शेतकरी शेतात जमा झालेले पाणी बाहेर काढण्यात व्यस्त होते. तर अनेक शेतकरी तणनाशक फवारणीच्या कामाला लागले होते. अशावेळी रविवारी दुपारनंतर पावसाने सुरुवात केली. मध्यरात्री जोरदार झालेला पाऊस सोमवारी दुपारपर्यंत सुरुच होता. या पावसामुळे जिल्ह्यात सरासरी ३६.४० मिलिमीटर पाऊस नोंदला आहे. जिल्ह्यात आजपर्यंत ६२८ मिलिमीटरनुसार वार्षिक सरासरी ७७.१० टक्के पावसाची नोंद झाली.

मुदखेड तालुक्यात सरासरी ओलांडली

एक जून ते १७ जुले या कालावधीत जिल्ह्यात सर्वच तालुक्यात जोरदार पावसाची नोंद झाली. यात सर्वाधीक पाऊस मुदखेड तालुक्यात झाला आहे. मुदखेडमध्ये पावसाळ्याच्या चार महिन्यांत ७७७.८० मिलिमीटर पाऊस पडतो. परंतु १७ जुलैपर्यंच पावसाने सरासरी ओलांडून आजपर्यंत १०३.४१ टक्क्यांनुसार ८०४.३० मिलिमीटर पाऊस झाला आहे. यासोबतच उमरी व हिमायतनगर तालुक्यात ९९ टक्के, नायगाव तालुक्यात ८६ टक्के, कंधार व धर्माबाद तालुक्यात ८५ टक्के, मुखेड, लोहा, भोकर व अर्धापूर तालुक्यांत ८० टक्क्यांपेक्षा अधिक पर्जन्यमान झाले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com