कोकणात पावसाचा जोर कायम

कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांत घाटमाथ्यावर पावसाला सुरुवात झाली असली तरी, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर अद्याप पावसाने अपेक्षित जोर धरलेला नाही.
Konkan Rain Updates
Konkan Rain UpdatesAgrowon

पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्याच्या विविध भागात ढगाळ हवामानासह (Cloudy Weather) पाऊस पडत आहे. कोकणात पावसाचा जोर (Rainfall) कायम असून, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातही पावसाने हजेरी (Rain Update) लावली आहे. विदर्भासह राज्याच्या उर्वरित भागात जोरदार पावसाची (Heavy Rain) प्रतीक्षा आहे.

सोमवारी (ता. २७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यांत पावसाचा जोर कायम होता. अनेक ठिकाणी संततधार पावसाने हजेरी लावली. रत्नागिरीतील राजापूर येथे सर्वाधिक ११० मिलिमीटर तर सिंधुदुर्गमधील देवगड येथे १०४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.(Konkan Rain Updates)

कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांत घाटमाथ्यावर पावसाला सुरुवात झाली असली तरी, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर अद्याप पावसाने अपेक्षित जोर धरलेला नाही. प्रमुख धरणांच्या पाणलोटात पाऊस सुरू झाला आहे. मात्र पाणीसाठ्यात वाढ होण्यासाठी जोरदार पाऊस कोसळण्याची आवश्यकता आहे.

उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात अनेक ठिकाणी पावसाने कमी-अधिक हजेरी लावली असली तरी जून महिना उलटत आला तरी अद्याप समाधानकारक पावसाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे पाऊस झालेल्या भागात पेरण्याची लगबग सुरू असली तरी, समाधानकारक पाऊस न झालेल्या भागात मात्र पेरण्या अद्यापही खोळंबल्याचे चित्र आहे.

सोमवारी (ता. २७) सकाळपर्यंतच्या २४ तासांत राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत : हवामान विभाग) :

कोकण :

रायगड : म्हसळा ५४, मुरूड ७२, पोलादपूर ३१, श्रीवर्धन ४५.

रत्नागिरी : चिपळूण ८१, दापोली ८५, गुहागर ८१, हर्णे ४५, लांजा १२०, मुलगुंद ५९, राजापूर १३०, रत्नागिरी ३५, संगमेश्वर ६७, वाकवली ४१.

सिंधुदुर्ग : देवगड १०४, कणकवली ८५, कुडाळ ७९, मुलदे (कृषी) ६१, रामेश्वर ५८, सावंतवाडी ७८, वैभववाडी ४७, वेंगुर्ला ४७.

मध्य महाराष्ट्र :

नगर : संगमनेर २३, शेवगाव ३८.

कोल्हापूर : चंदगड ४८, गगनबावडा ४२, पन्हाळा ३५, राधानगरी ३३.

सातारा : महाबळेश्वर ४१.

सोलापूर : जेऊर ३५.

मराठवाडा :

लातूर : देवणी ४७, लातूर ४८, शिरूर अनंतपाळ ४२, उदगीर ३८. उस्मानाबाद : भूम ५७.

विदर्भ :

गडचिरोली : देसाईगंज २१.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com