Wheat Research : गहू संशोधनात डॉ. रसाळ यांचे महत्त्वपूर्ण योगदान : गमे

मातीशी अतूट नाते जोपासणारे व्यक्तिमत्त्व म्हणून डॉ. रसाळ यांनी नाव कमावले आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठात २९ वर्षे कृषी शास्त्रज्ञ म्हणून त्यांनी काम केले.
Wheat Research
Wheat ResearchAgrowon

नाशिक ः गव्हाच्या पिकावर संशोधन (Wheat Research) करून डॉ. प्रमोद रसाळ यांनी अधिक उत्पादन देणाते विविध सुधारित वाण विकसित केले.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी हे वाण अतिशय महत्त्वपूर्ण ठरले आहेत. त्यांचे कृषी संशोधन, (Agricultural Research) कृषी शिक्षण क्षेत्रातील योगदान महत्त्वपूर्ण राहिले आहे, असे गौरवोद्गार नाशिक विभागाचे महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी काढले.

मातीशी अतूट नाते जोपासणारे व्यक्तिमत्त्व म्हणून डॉ. रसाळ यांनी नाव कमावले आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठात २९ वर्षे कृषी शास्त्रज्ञ म्हणून त्यांनी काम केले.

लोकाभिमुख स्वभावामुळेच ते शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय झाले. नुकतेच ते सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्ताने कुटुंबीय व मित्र परिवाराच्या वतीने गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी गमे बोलत होते.

कार्यक्रमास ‘नाफेड’चे संचालक नानासाहेब पाटील, माजी उपविभागीय कृषी अधिकारी चंद्रभान कानवडे, डी. बी. पाटील, विद्यापीठाचे डॉ. मिलिंद अहिरे, डॉ. कल्याण देवळाणकर, डॉ. ज्ञानदेव गाडेकर, डॉ. अरुण गवळी आदी उपस्थित होते.

Wheat Research
Wheat Market: सरकार खुल्या बाजारात गहू विकण्याची शक्यता

सत्कारास उत्तर देताना डॉ. रसाळ यांनी शेतकऱ्याचा मुलगा ते कृषी विद्यापीठातील अधिष्ठाता पदापर्यंतचा प्रवास मांडला. सूत्रसंचालन विशाल रसाळ व नेहा रसाळ यांनी केले तर आभार माधुरी रसाळ यांनी मानले.

कृषी योगदानाबद्दल सन्मान ः

कृषिविषयक योगदानाबद्दल केंद्र सरकारचा डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार, माजी पंतप्रधान (कै.) चौधरी देवीलाल स्मृती पुरस्कार, बी.आर.सी. मुंबई यांचा पुरस्कार, टी.एन.ए.यू. कोईम्बतूर आदी महत्त्वपूर्ण पुरस्कारांनी डॉ. रसाळ यांना सन्मानित करण्यात आले आहे. महाराष्ट्र सरकारने त्यांना अत्यंत प्रतिष्ठेचा कृषिरत्न पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com