Lumpy Skin : ‘लम्पी स्कीन’ बाबत दक्षता घेऊन सहकार्य करा

पशुपालकांनी याबाबत शासनाने आवाहन केल्याप्रमाणे उपाययोजना करून बाधित जनावरांना तत्काळ औषधोपचार सुरू करावेत, असे आवाहन खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केले.
Lumpy Skin
Lumpy Skin Agrowon

नांदेड : पशुधनामध्ये (Livestock) लम्पी साथरोगाचा (Lumpy Skin Disease) प्रादुर्भाव जिल्ह्यातील काही गावांमध्ये आढळून आला आहे. पशुपालकांनी याबाबत शासनाने आवाहन केल्याप्रमाणे उपाययोजना करून बाधित जनावरांना तत्काळ औषधोपचार सुरू करावेत, असे आवाहन खासदार प्रताप पाटील चिखलीकर(Pratap Patil Chikhlekar) यांनी केले.

Lumpy Skin
Lumpy Vaccine : ‘लम्पी’ लसीसाठी पैसे घेणारी पशुधन पर्यवेक्षक निलंबित

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथे आयोजित केलेल्या लम्पी आजाराच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे, मनपाचे अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. मधुसूदन रत्नपारखी, महावितरण नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर, अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव, जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. भूपेंद्र बोधनकर, सहायक आयुक्त प्रवीणकुमार घुले, डॉ. अरविंद गायकवाड आदींची उपस्थिती होती.

Lumpy Skin
Lumpy Skin : देशभरात ‘लम्पी’मुळे सुमारे ५७ हजार गायींचा मृत्यू

जनावरातील साथीच्या आजाराबाबत रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे. विशेषत: नांदेड शहरात मोकाट जनावरांचा प्रश्‍न अधिक गंभीर आहे. मनपाने यात तातडीने लक्ष घालून उपाययोजना कराव्यात असे निर्देश खासदार चिखलीकर यांनी दिले.

Lumpy Skin
Weather Update : उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात पावसाची शक्यता

याचबरोबर गावपातळीवर दवंडी व इतर संपर्काची माध्यमे प्रभावीपणे उपयोगात घ्यावीत, असे त्यांनी स्पष्ट केले. साथरोगावर नियंत्रणासाठी सर्व ग्रामपंचायत पातळीवर स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. जिल्हा परिषद पशुवैद्यकीय विभाग संबंधित यंत्रणाशी समन्वय साधून आहे.

यासाठी औषधोपचाराची कुठलीही कमतरता नसून राज्य शासनाच्या निर्देशाप्रमाणे योग्य ती खबरदारी घेतल्याची माहिती वर्षा ठाकूर यांनी दिली. प्रवीणकुमार घुले यांनी लम्पी आजाराबाबत जिल्ह्यातील आढावा सादर केला आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com