Corn Market : देशात मक्याचा बाजार दबावात

काही बाजारांत नव्या मक्याची आवक सुरू; हमीभावापेक्षा कमी दर
orn
ornAgrowon

पुणे ः देशातील काही बाजारांमध्ये (APMC) नव्या मक्याची आवक सुरु झाली आहे. मात्र पावसाने काढणीला आलेल्या मका पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान (Corn Crop Damage) केले. तर बाजारात आवक होत असलेल्या मक्यामध्ये ओलावा जास्त येत आहे. त्यामुळे नव्या मक्याला हमीभावापेक्षा कमी दर मिळतो आहे.

देशातील बाजारात नव्या मक्याची आवक आता सुरु झाली आहे. कर्नाटक, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये नवा मका बाजारात येत आहे. यंदा केंद्र सरकारने मक्यासाठी १ हजार ९६२ रुपये हमीभाव जाहीर केला. मात्र नव्या मक्यामध्ये ओलावा अधिक येत असल्याने दर हमीभावापेक्षाही कमी झाले. मागील १५ ते २० दिवस देशातील बहुतेक भागांमध्ये पाऊस झाला. त्यामुळे मक्याची काढणी रखडलेली आहे. तर काही ठिकाणी मका सुकविण्याचे काम सुरु आहे.

orn
Sweet Corn : स्वीटकॉर्न सह प्रक्रियायुक्त मालाची सहा देशांना निर्यात

देशातील बाजारांमध्ये सप्टेंबर महिन्यापर्यंत मका दरात तेजी होती. मात्र मक्याचे दर वाढल्याने पशुखाद्यात तांदूळ आणि बाजरीचा समावेश वाढला होता. त्यामुळे मक्याला उठाव कमी होऊन दर घटले. नव्या मक्यामध्ये ओलावा जास्त असल्याने या मक्याला प्रतिक्विंटल १६०० ते २ हजार रुपये दर मिळतोय. तर जूना मका प्रतिक्विंटल २ हजार १०० ते २ हजार ३०० रुपयाने विकला जात आहे.

देशात काही प्रमाणात जुना मका उपलब्ध आहे. शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी दरवाढीच्या अपेक्षेने जुना मका मागे ठेवला होता. मात्र दर दबावात आल्याने माल शिल्लक आहे. सध्या जूना मका प्रतिक्विंटल २ हजार १०० ते २ हजार ३०० रुपयाने विकला जात आहे. नव्या मक्यातील ओलावा कमी झाल्यानंतर यादरम्यानच दर मिळतील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

उत्पादनाला बसणार फटका

मागील हंगामात २२६ लाख टन मका उत्पादन झाले होते. देशात यंदा मका उत्पादन २३१ लाख टनांवर पोचेल, असा अंदाज केंद्र सराकरने जाहीर केला. मात्र ऑक्टोबरमध्ये झालेल्या पावसाने काढणीला आलेल्या मक्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. त्यामुळे उत्पादनाला फटका बसणार आहे. सध्या देशातील बाजारांमधील आवक कमी असली तरी दिवाळीनंतर आवक वाढणार आहे, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com