
बीजिंग (वृत्तसंस्था) : चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने (China Covid Outbreak) हाहा:कार माजविला आहे. शांघाय आणि अन्य काही शहरात रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत ८५ ते ९५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. रुग्णालयातील खाटा कमी पडू लागल्या असून त्यांच्यावर जमिनीवर उपचार केले जात आहेत. डॉक्टर आणि परिचारिकांची संख्या देखील कमी झाली असून औषध आणि ऑक्सिजनचे संकटही निर्माण झाले आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ धक्कादायक असून येत्या तीन महिन्यांत स्थिती गंभीर राहू शकते, असा इशारा देण्यात आला आहे.
चीनमध्ये शेकडो नागरिक मृत्युमुखी पडत असल्याचे चित्र आहे. रुग्णालयांना मृतदेह ठेवण्यास जागा अपुरी पडत आहे. खोलीपासून ते रुग्णालयाच्या आवारात मृतदेह ठेवले जात आहेत. स्मशानभूमित मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी रांगा लागत आहेत. तज्ज्ञांनी येत्या दोन तीन महिन्यांत चीनमधील सुमारे ८ कोटी नागरिकांना कोरोनाची लागू होऊ शकते, असे भाकीत केले आहे.
कोरोना पसरल्यामुळे चीनमधील रस्ते ओस पडले आहेत. धडधाकट नागरिक घराबाहेर पडण्यास बिचकत आहेत. चीनच्या सरकारने अगोदरच लॉकडाउन लागू केले आहे. शांघाय रेल्वे स्थानकावर आणि विमानतळावर नागरिकांची गर्दी उसळली आहे. दुसऱ्या शहरात पलायन होत असून शांघाय येथे कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे.
नॅशनल ब्युरो ऑफ एशियन रिसर्चने केलेल्या दाव्यानुसार यावर्षी हिवाळ्यात चीनमध्ये ८ कोटींपेक्षा अधिक लोकांना कोरोनाची लागण होऊ शकते. तसेच संसर्ग पसरण्याचा वेग आणखी वाढेल, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. चीनमध्ये आता केवळ १ लाख लोकांमागे दहा आयसीयू बेडची व्यवस्था आहे. संसर्ग वाढत असताना आणि खाटा कमी पडत असताना रुग्णांना जमिनीवरच झोपावे लागत आहे.
कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार रुग्णालयात मृतदेह ठेवण्यास जागा नसल्याचे दिसून येते. स्मशानभूमित अंत्यसंस्कारासाठी वाट पाहावी लागत आहे. चीनकडून आकडेवारी लपविली जात असल्याचा आरोप केला जात आहे. नोव्हेंबर मध्यांपर्यंत ११ जणांचा मृत्यू झाल्याचे सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याचवेळी दररोज दहा हजारांहून अधिक नागरिकांना कोरोनाची बाधा होत आहे. दुसरीकडे स्मशानभूमी आणि रुग्णालयातील व्हिडिओ मात्र कोरोनाची भयंकर स्थिती दाखवत आहेत.
अनेक ठिकाणाहून हटविले होते निर्बंध
देशात मोठ्या प्रमाणात आंदोलन होऊ लागल्याने सात डिसेंबर रोजी चीनच्या अनेक भागांतून निर्बंध काढण्यात आले. लोकांनी झीरो कोरोना धोरणाला तीव्र विरोध केला. निर्बंध उठविण्यात आले तेव्हा चाचणीचे प्रमाणही घसरले. चीनच्या ९० टक्के नागरिकांनी संपूर्ण लस घेणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. आतापर्यंत निम्म्याच लोकांनी लसीचे तीन डोस घेतले आहेत. त्यातही ८० पेक्षा अधिक वयोगटातील लोकांची संख्या अधिक आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.