Cotton : कपाशीचे लागवड क्षेत्र गतवर्षीपेक्षा वाढले

परभणी जिल्ह्यात यंदाच्या (२०२२) खरीप हंगामात कपाशी १ लाख ८६ हजार ८४० हेक्टरवर लागवड झाली आहे.
Cotton
Cotton Agrowon

परभणी ः परभणी जिल्ह्यात यंदाच्या (२०२२) खरीप हंगामात कपाशी (Kharif Cotton Cultivation) १ लाख ८६ हजार ८४० हेक्टरवर लागवड (Cotton Cultivation) झाली आहे. गतवर्षीच्या (२०२१) तुलनेत यावर्षी कपाशीच्या लागवड क्षेत्रात ५ हजार ६८४ हेक्टरने वाढ झाली आहे. यंदाच्या खरिपातील आजवरच्या पेरणी क्षेत्रात कपाशीचे लागवड (Area Under Cotton Cultivation) क्षेत्र ३६.३८ टक्के एवढे आहे.

Cotton
Cotton : शेतकरी पीक नियोजन : कपाशी

काही वर्षापूर्वी खरीप हंगामात कापूस हेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रमुख नगदी पीक होते. परंतु निविष्ठांच्या किमती,मजुरीच्या दरात झालेली वाढ, परिणामी एकंदरीत वाढलेला उत्पादन खर्च, बोंडअळीसह अन्य कारणांनी घटलेली उत्पादकता, कमी बाजारभाव आदी कारणांमुळे तसेच तुलनेने किफायतशीर ठरत असल्यामुळे शेतकरी सोयाबीनला पसंती देत आहेत. त्यामुळे कपाशीच्या क्षेत्रात दरवर्षी घट झाली आहे.जिल्ह्यात २०१२ ते २०१७ या पाच वर्षाच्या कालावधीत कपाशीचे सरासरी क्षेत्र १ लाख ८९ हजार ३५० हेक्टर होते.त्यानंतरच्या सहा वर्षात कपाशीचे लागवड क्षेत्र कमी अधिक होत झाले आहे. यंदाच्या जुलै अखेर पर्यंत कृषी विभागाच्या अहवालानुसार कपाशीची १ लाख ९२ हजार २१३ पैकी १ लाख ८६ हजार ८४० हेक्टर (९७.२० टक्के) लागवड झाली आहे.

Cotton
Cotton Rate : कापूस दरातील तेजी परतणार?

गतवर्षी २०२१-२२ मधील खरेदी हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात कपाशीचे दर १३ हजार रुपये क्विंटलपर्यंत पोचले होते.आगामी काळात किमान दहा हजार रुपयांपर्यंत दर मिळतील या आशेने यंदा अनेक शेतकरी कापूस लागवडीकडे वळले.परिणामी गतवर्षीच्या १ लाख ८१ हजार १५६ हेक्टरच्या तुलनेत यंदा कपाशीच्या लागवड क्षेत्रात साडेपाच हजारांवर हेक्टरने वाढ झाली आहे. परभणी, जिंतूर, सेलू, गंगाखेड या चार तालुक्यांत सरासरीपेक्षा जास्त तर पाथरी, मानवत, सोनपेठ, पालम, पूर्णा या पाच तालुक्यात सरासरीपेक्षा कमी लागवड झाली आहे. यंदाच्या खरिपातील पेरणी क्षेत्र अंतिम करण्यात आल्यानंतर कपाशीचे एकूण लागवड क्षेत्र स्पष्ट होईल.

Cotton
Cotton : अकोल्यात कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव

२०२२ तालुकानिहाय कापूस लागवड (हेक्टरमध्ये)

तालुका...सरासरी क्षेत्र...लागवड क्षेत्र...टक्केवारी

परभणी...३२०००...३२८९०...१०२.७८

जिंतूर...२७२८५...२९५१३...१०८.१६

सेलू...२९८३१...३१७१६...१०६.३२

मानवत...२१२३३...२०६९०...९७.४४

पाथरी...२१२२८...१६४३२...७७.४१

सोनपेठ...१६४०१...१५७३६...९५.९४

गंगाखेड...१९६८३....२१११०...१०७.२५

पालम....१४५३५...१४५१९...९९.८९

पूर्णा...१००१५...४२३४...४२.२८

वर्षेनिहाय कापूस लागवड क्षेत्र स्थिती (हेक्टरमध्ये)

वर्षे...कापूस लागवड

२०१६...१६७६०४

२०१७...१९१७०९

२०१८...१९९८६९

२०१९...२०६९६५

२०२०...१९९६८३

२०२१...१८११५६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com