यंदा कापूस लागवड घटणार की वाढणार?

देशात यंदाच्या खरीप हंगामात कापसाची विक्रमी लागवड होण्याची चिन्हे आहेत. यंदा कापसाच्या लागवक्षेत्रात तब्बल १५ टक्के वाढ होण्याचा अंदाज कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया (सीएआय)ने वर्तवला आहे
यंदा कापूस लागवड घटणार की वाढणार?
cottonagrowon

1. राज्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. पाऊस उंबरठ्यावर आला तरी अजूनही राज्यात तीन लाख टन ऊस गाळपाची वाट बघत वावरात उभा आहे. सर्वाधिक ऊस शिल्लक आहे मराठवाड्यात. दरवर्षी साधारण मेच्या शेवटी उसाचा गाळप हंगाम पूर्ण होतो. यंदा मात्र अतिरिक्त उसामुळे जून उजाडला तरी २० साखर कारखान्यांचं धुराडं सुरूच आहे. मराठवाड्यात हंगामाच्या सुरुवातीला एकूण ६० साखर कारखान्यांनी गाळप सुरू केलं होतं. मराठवाड्यातील जालना, औरंगाबाद आणि बीड या जिल्ह्यात सर्वाधिक ऊस शिल्लक आहे.


2. कापसाच्या भडकलेल्या किंमती आणि इंधनदरात झालेली वाढ यामुळे आशियाई देशांतील वस्त्रोद्योग अडचणीत आला आहे. रशिया आणि युक्रेन (Russia and Ukraine)यांच्यातील युद्धामुळे आशियाई वस्त्रोद्योगाला अडचणींचा सामना करावा लागतोय. कारण चीन आणि बांगलादेश या दोन आशियाई देशांतून सर्वाधिक कापड युरोपमध्ये निर्यात केले जाते. मात्र युध्दामुळे जागतिक व्यापार मंदावला आहे. तसेच कापसाच्या वाढत्या किंमतींमुळे वस्त्रोद्योग क्षेत्राचं आर्थिक गणित बिघडलं आहे. बांगलादेश आणि भारतातील लहान वस्त्रोद्योग युनिटची अवस्था बिकट झाली आहे.

3. देशात यंदाच्या खरीप हंगामात कडधान्यांची लागवड घटण्याची शक्यता आहे. विशेषतः महाराष्ट्र आणि कर्नाटक या प्रमुख राज्यांत कडधान्यांना(Cereals) फटका बसण्याची शक्यता आहे. या राज्यांत शेतकरी कापूस, सोयाबीन, मका आणि उसाकडे वळण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे कडधान्यांचा पेरा घटेल. गेल्या काही वर्षांपासून सरकारच्या शेतकरीविरोधी आयात-निर्यात धोरणांमुळे कडधान्य पिके शेतकऱ्यांसाठी आतबट्ट्याची ठरली आहेत. यंदा देशातील कडधान्य लागवड क्षेत्रात पाच ते पंधरा टक्के घट होण्याची शक्यता आहे.


4. भारतात या आठवड्यात सोन्याची मागणी कमी झाल्याचे दिसून आले. सोन्याच्या(GOLD) वाढलेल्या किंमती आणि लग्नसराईचा काळ संपत आल्यामुळे सोन्याची मागणी घटली आहे. जूनमध्ये मागणी आणखी कमी राहण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागात पुढील काही आठवड्यात सोन्याची मागणी आणखीनच घटेल. कारण आता पाऊस सुरू झाला आहे, शेतकरी खरिपाच्या पेरण्यांमध्ये अडकून पडतील. त्यामुळे सोन्याची खरेदी मंदावेल, असे मुंबई येथील एका डिलरने सांगितले.

cotton
कडधान्याच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यता

5. देशात यंदाच्या खरीप हंगामात कापसाची विक्रमी लागवड होण्याची चिन्हे आहेत. यंदा कापसाच्या (cotton)लागवक्षेत्रात तब्बल १५ टक्के वाढ होण्याचा अंदाज कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने म्हणजे सीएआयने(CAI) वर्तवला आहे. गेल्या हंगामात शेतकऱ्यांना कापसातून चांगले पैसे मिळाले. त्यामुळे शेतकरी इतर पिकांऐवजी कापसाला पसंती देतील, असं मानलं जात आहे. लागवड क्षेत्र वाढल्यामुळे कापूस उत्पादनात वाढ झाल्यास स्थानिक आणि जागतिक बाजारपेठेतील कापसाचे भडकलेले दर कमी होण्यास मदत होईल, असे उद्योगक्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.‘‘इतर पिकांपेक्षा शेतकऱ्यांना(farmer) कापसातून चांगला परतावा मिळाला. त्यामुळे यंदाच्या खरिपात देशात कापूस लागवडीचे क्षेत्र १५ टक्क्याने वाढेल,'' असे सीएआयचे अध्यक्ष अतुल गणात्रा म्हणाले. गेल्या वर्षी १२० लाख हेक्टरवर कापसाची लागवड झालेली होती. यंदा ती १३८ लाख हेक्टरवर पोहोचण्याचा अंदाज आहे. सीएआयच्या मते गुजरात आणि महाराष्ट्रात सर्वाधिक क्षेत्रवाढ होण्याचा अंदाज आहे. या दोन राज्यांत मिळून देशातील जवळपास निम्मा कापूस पिकवला जातो. सरलेल्या वर्षात कापसाचे दर दुप्पटीहून जास्त वाढले. कारण कापूस काढणीच्या काळात जोरदार पाऊस झाल्यामुळे पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे कापूस उत्पादनाने गेल्या दहा वर्षांतील निचांकी पातळी गाठली. देशातील प्रमुख कापूस उत्पादक राज्यांमध्ये कडधान्य आणि तेलबिया पिकांखालील क्षेत्र कमी होऊन कापसाची लागवड वाढेल, असं एकंदरित चित्र आहे. गेल्या हंगामात कापसामध्ये अभुतपूर्व तेजी आली. देशातील स्थानिक बाजारात तसेच आंतरराष्‍ट्रीय बाजारातही कापसाचे दर चढे राहिले. विक्रमी तेजीनंतर सध्या कापसाचे दर काहीसे कमी झाले आहेत. परंतु दीर्घकालिन ट्रेंड पाहता कापसात मोठी पडझड किंवा मंदीची शक्यता नाही, असे या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितलं.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com