चार कंपन्यांचे कपाशी बियाणे तपासणीत नापास

बियाण्यांचे नमुने तपासणीसाठी नागपूर येथील बीजपरीक्षण प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यामध्ये चार बियाणे उत्पादक कंपन्यांच्या बियाण्यांचे नमुने अपयशी ठरले आहेत.
Cotton Seed
Cotton SeedAgrowon

यवतमाळ : पेरणीपूर्व कापूस बियाण्यांच्या (Cotton Seed) तपासणीत चार नमुने निकृष्ट असल्याचा अहवाल नागपूर येथील बीजपरीक्षण प्रयोगशाळेने दिला आहे. ज्या चार कंपन्यांचे नमुने रद्द ठरले आहेत. त्या बियाणे उत्पादक कंपन्यांना कृषी विभागाने विक्रीबंदीचे आदेश दिले आहेत.

बोंड अळी रोखण्यासाठी बीटी कापूस बियाण्यांची (Cotton Seed) पेरणीपूर्वीच काटेकोर तपासणी करण्याचा आदेश शासनाने आधीच दिला होता. त्याशिवाय १ जूनपर्यंत कापूस बियाणे शेतकऱ्‍यांना विक्रीस मनाई करण्यात आली होती. जूनपासून कापूस विक्रीला सुरुवात झाली आहे. त्यानंतर कृषी विभागाच्या वतीने कापूस, सोयाबीन बियाण्यांचे नमुने घेण्यात आले.

जिल्ह्यातून बियाण्यांचे ३३७, तर खतांचे ६९ नमुने घेतले. बियाण्यांचे नमुने तपासणीसाठी नागपूर येथील बीजपरीक्षण प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यामध्ये चार बियाणे उत्पादक कंपन्यांच्या बियाण्यांचे नमुने अपयशी ठरले आहेत. आता या चार कंपन्यांना सध्या ‘स्टॉप सेल’चे आदेश देण्यात आले आहेत. बियाणे नमुने निकृष्ट आढळलेल्या उत्पादकांमध्ये कापसाचे बियाणे बोगस आढळले आहे. त्यात कंपन्यांच्या नमुन्यांचा समावेश आहे.

कापूस पिकावर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला. पीक नुकसानीसाठी शासनाने घोषित केलेली मदत शेतकऱ्‍यांच्या पदरात पडली नाही. तेव्हापासून बोंड अळी येऊ नये, यासाठी शासन खबरदारी घेत आहे. मात्र, कंपन्यांनी शासनाच्या या प्रयत्नाला वाटाण्याच्या अक्षता लावल्याचे चित्र आहे. नमुने निकृष्ट आल्याने कृषी विभागाने संबंधित बियाण्यांची विक्री करू नये, अशा सूचना दिल्या आहेत.

शेतकऱ्यांची वाढली चिंता

सध्या विक्रीबंदीचे आदेश असले तरी काही शेतकऱ्यांनी संबंधित कंपनीचा माल विकत घेतला असण्याची शक्यता आहे. शेतकऱ्‍यांनी पेरणी केली असल्यास त्यांच्या जिवाला घोर लागण्याची शक्यता आहे.

पेरणीपूर्वी नमुने तपासणीसाठी नागपूर येथे पाठविले होते. त्यात चार नमुने नापास झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. संबंधितांना विक्रीबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यांच्यावर बियाणे कायद्यानुसार कारवाई केली जाईल.

राजेंद्र माळोदे, कृषी विकास अधिकारी, यवतमाळ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com