Pune By Election Result: कसबा, चिंचवडमध्ये आज मतमोजणी

दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत उत्सुकता लागून असलेल्या आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांपासून, आगामी येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकांची लिटमस टेस्ट असलेल्या कसबा आणि चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी रविवारी (ता. २६) झालेल्या मतदानाची मोजणी गुरुवारी (ता. २) होत आहे.
Pune By Election Result
Pune By Election ResultAgrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
पुणे ः दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत उत्सुकता लागून असलेल्या आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांपासून, आगामी येऊ घातलेल्या लोकसभा (Loksabha) निवडणुकांची लिटमस टेस्ट असलेल्या कसबा आणि चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी रविवारी (ता. २६) झालेल्या मतदानाची मोजणी गुरुवारी (ता. २) होत आहे.

कसब्यामध्ये ५०.०६ तर चिंचवडमध्ये ५०.४७ टक्के मतदान झाले होते. पोटनिवडणुकीत मतदानाच्या वाढलेल्या टक्केवारीमुळे प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी विजयाचे दावे केले आहेत. कोणाचा दावा खरा ठरतो हे आज दुपारी स्पष्ट होणार आहे.

कसबा विधानसभेसाठी आमदार मुक्ता टिळक यांच्या तर चिंचवड विधानसभेसाठी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या अकाली निधनामुळे पोटनिवडणुकांसाठी मतदान झाले होते.

या निवडणुकीसाठी कसब्यामधून हेमंत रासने (भाजप) महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर (कॉंग्रेस) यांच्यात थेट लढत होत आहे.

तर चिंचवडमध्ये अश्‍विनी जगताप (भाजप) नाना काटे (महाविकास आघाडी - राष्ट्रवादी कॉंग्रेस) आणि राहुल कलाटे (बंडखोर शिवसेना ठाकरे गट) यांच्यात लढत होत आहे.

Pune By Election Result
Gram Panchayat Election : ग्रामपंचायत निवडणुकीची आज मतमोजणी

दरम्यान कसबा पोटनिवडणुकीची मतमोजणी कोरेगावपार्क येथील धान्य गोदामात होत असून, मतमोजणीच्या २० फेऱ्या होणार आहेत.

तर चिंचवडची मतमोजणी ३७ फेऱ्या होणार आहेत. या दोन्ही मतमोजणी केंद्रांचा आढावा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी बुधवारी (ता. १) घेतला

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com