
नगर ः ‘‘नगर, बीड जिल्ह्याला वारकरी साप्रदायची (Warkari Tradition) परंपरा आहे. संत वामनभाऊ महाराज यांनी समाजासाठी मोठे काम केले. आमची वाटचालही नाथांच्या आणि गोपीनाथांच्या (गोपीनाथ मुंडे) (Gopinath Munde) यांच्या आशीर्वादाने सुरु आहे. वारकरी परंपरेने देश, धर्म आणि देव वाचविला आहे,’’ असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanavis) यांनी व्यक्त केले.
नगर-बीड जिल्ह्याच्या सीमेवरील गहिनीनाथगड (चिंचोली) येथे रविवारी (ता.१५) संत वामनभाऊ महाराज यांच्या ४७ व्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम झाला.
फडणवीस यांच्यासह गहिनीनाथगडाचे मठाधिपती विठ्ठल महाराज, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, आमदार सुरेश धस, माजी आमदार भीमराव धोंडे, आमदार लक्ष्मण पवार, बाळासाहेब आजबे, मोनिका राजळे, माजी आमदार साहेबराव दरेकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, अक्षय मुंदडा, कुडलिंक खांडे आदी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, ‘‘संत वामनभाऊ सर्वांचे आदर्श होते. मराठवाडा ही संतांची पंढरी आहे. नाथांचा आशीर्वाद घेण्यासाठी येथे मी आलोय.
आम्हाला मच्छिंद्रनाथ, गहिनीनाथ, कानिफनाथांचा आशीर्वाद मिळालाच, पण राजकारणात गोपीनाथांचा आशीर्वाद मिळाला.
नाथांची स्थाने म्हणजे वारकरी सांप्रदायाचे मुळ आहेत. पुढे ही परंपरा संत तुकाराम महाराजांपर्यंत सुरु आहे. देव, देश, धर्म वारकरी परंपरेमुळेच वाचलेला आहे.’’
‘‘सातत्याने आक्रमण होत असताना छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची मशाल पेटवली. त्याआधी वारकरी परंपरेने रात्र अंधारी असताना महाराष्ट्र धर्म, देश वाचविला. गहिनाथगडाच्या विकासासाठी भरीव निधी देणार आहे. त्यासाठी आराखडा करू.’’
विठ्ठल महाराज यांच्या हस्ते फडणवीस यांच्या हाती या वेळी भगवा ध्वज देण्यात आला. ‘भगव्या ध्वजाचा सांभाळ करण्याची माझी जबाबदारी आहे.
यामुळे सेवा करण्याची संधी मिळाली आहे. गहिनानाथगडाचा सेवेकरी म्हणून मी काम करेन.’ असे फडणवीस म्हणाले. या वेळी नगर, बीड, सोलापूर, पुणे, औरंगाबाद, नाशिक, उस्मानाबाद, जालना आदी भागांतून मोठ्या प्रमाणात भाविक आले होते.
मुंडे भगिनींची गैरहजेरी
नवनाथांपैकी एक असलेल्या गहिनीनाथ महाराजांची नगर-बीड जिल्ह्यांच्या सीमेवर समाधी आहे. तसेच संतश्रेष्ठ वामनभाऊ महाराज यांचेही येथे समाधीस्थळ आहे. श्री गहिनीनाथगडावर दरवर्षी पुण्यतिथी सोहळ्याला देशभरातून लाखो भाविक येतात.
आधी स्व. गोपीनाथ मुंडे आणि त्यांच्यानंतर माजी मंत्री पंकजा मुंडे, खासदार प्रतिम मुंडे कार्यक्रमाला हजर असतात. यंदा मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येथे आलेले असताना दोन्ही मुंडे भगिनींची गैरहजेरी दिसून आली. त्याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.