Women Agri College : औरंगाबादला देशातील पहिले महिला कृषी महाविद्यालय

महिलांसाठी देशातील पहिले कृषी महाविद्यालय स्थापन करण्याची घोषणा कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी विधान परिषदेत कलम ९३ अंतर्गत चर्चेदरम्यान बोलताना केली.
Maharashtra Assembly Session
Maharashtra Assembly SessionAgrowon

नागपूर : महिलांसाठी देशातील पहिले कृषी महाविद्यालय (Women Agriculture College) स्थापन करण्याची घोषणा कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी विधान परिषदेत कलम ९३ अंतर्गत चर्चेदरम्यान बोलताना केली. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत औरंगाबाद (छत्रपती संभाजी नगर) येथे या महाविद्यालयाची उभारणी करण्यात येणार आहे.

Maharashtra Assembly Session
Agriculture Export : शेतीमाल निर्यातीत वाढ झाल्याचा कृषी मंत्रालयाचा दावा पटतो का ?

विधान परिषदेत सदस्य सतीश चव्हाण यांनी महिला कृषी महाविद्यालयाबाबतचा मुद्दा निवेदनाच्या माध्यमातून उपस्थित केला. या वेळी उपस्थित कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावर उत्तर देताना प्रारंभी महिलांसाठी कृषी शिक्षणक्रमात पूर्वीपासूनच राखीव जागा असल्याने अशाप्रकारचे महाविद्यालय स्थापन करता येणार नाही किंवा त्याची गरज नसल्याचे सभागृहात सांगितले. त्याऐवजी सरकार परभणी कृषी विद्यापीठाचे उपकेंद्र औरंगाबादला उभारण्यासाठी उत्साही असल्याची माहिती मंत्री सत्तार यांनी सभागृहात दिली.

Maharashtra Assembly Session
Agriculture Biodiversity : फळपिकांसोबत वीणा जपतेय शिवाराची जैवविविधता

ते म्हणाले, की राज्यात सध्या ४८ शासकीय आणि १५२ खासगी, विनाअनुदानित कृषी महाविद्यालये असून, या माध्यमातून १६ हजार ४४० विद्यार्थी शिक्षण घेतात. या सर्व शासकीय आणि खासगी महाविद्यालयांमध्ये ३० जागा महिलांसाठी राखीव आहेत. त्यासोबतच विविध जाती संवर्गासाठी ३० टक्‍के आरक्षण नियमानुसार दिले जाते.

त्यामुळे महिलांसाठी स्वतंत्र कृषी महाविद्यालयाची आवश्‍यकता नाही. परंतु सदस्य श्री. चव्हाण यांनी पुन्हा महिलांसाठी अशाप्रकारचे महाविद्यालय असावे, अशी आग्रही मागणी लावून धरली. त्याची दखल घेत अखेरीस कृषिमंत्री सत्तार यांनी ही मागणी मान्य केली. महिलांसाठी औरंगाबाद येथे देशातील पहिले स्वतंत्र महिला कृषी महाविद्यालय उभारणीची घोषणा केली, त्यासोबतच कृषी विद्यापीठाच्या उपकेंद्राला देखील मान्यता देण्याचे त्यांनी जाहीर केले.

कृषिमंत्र्यांनी जाहीर केलेला हा निर्णय क्रांतिकारी असाच आहे. खऱ्या अर्थाने पुरोगामी राज्य असल्याचे महाराष्ट्राने सिद्ध केले असून, महिला सक्षमीकरणाला या माध्यमातून बळ मिळेल. याचे दूरगामी परिणाम येत्या काळात दिसून येतील व हा नवा अध्याय शिक्षण क्षेत्रात जुळणार आहे. त्यासोबतच औरंगाबादला कृषी विद्यापीठाचे उपकेंद्र उभारण्याबाबत घेतलेला निर्णय देखील बळ देणारा असाच आहे. औरंगाबादवरून २५० किलोमीटर अंतरावरील परभणीला येणे वेळकाढू ठरते. परिणामी अनेक प्रकल्प रखडतात. उपकेंद्रामुळे याला चालना मिळण्यास मदत होणार आहे.

- डॉ. इंद्रमणी मिश्रा, कुलगुरू, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com