Millet Production : तृणधान्य पिकांच्या उत्पादन वाढीसाठी जनजागृती करा ः जिल्हाधिकारी अरोरा

संयुक्त राष्ट्रसंघाने २०२३ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष’ घोषित केले आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कार्यकारणी समिती स्थापन करण्यात आली आहे.
Millet
MilletAgrowon

अकोलाः संयुक्त राष्ट्रसंघाने (United Nation) २०२३ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष’ (International Millet Year) घोषित केले आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कार्यकारणी समिती स्थापन करण्यात आली आहे.

Millet
Millet In Diet : पौष्टिक भरडधान्यांचा आहारत वाढवू वापर

या समितीच्या बैठकीत तृणधान्य पिकांच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी तसेच त्यांचा आहारात वापर वाढविण्याकरीता नागरिकांमध्ये जनजागृती करा, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले.

Millet
Pearl Millet Sowing : बाजरीची पेरणी रखडली

‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष’ साजरे करण्यासंदर्भात झालेल्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. मुरली इंगळे, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा समन्वयक वर्षा खोब्रागडे, सर्व तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते.

पौष्टिक तृणधान्य पिकांच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी तसेच त्यांचा आहारात वापर वाढविण्याकरीता ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष’ साजरे करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हास्तरीय कार्यकारणीत सदस्य सचिव म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांसह २४ विभागातील सदस्यांची समिती तयार करण्यात आली आहे.

या समितीमार्फत महिनानिहाय वर्षभर कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. त्यात शास्त्रज्ञाव्दारे व्याख्याने, रॅली, महिला बचत गटांचे शिबीर, मार्गदर्शन कार्यशाळा, वकृत्त, चित्रकला, भाषण स्पर्धा पार पडणार आहेत, अशी माहिती डॉ. मुरली इंगळे यांनी दिली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com