Kharip Sowing: शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

अतिवृष्टीमुळे (Extremely Heavy Rain) सोयाबीन, तूर, मूग, उडीद, कापूस आदी बियाणे जमिनीत दडपून गेले असून शेतकरी चिंतातूर झाले आहेत. आर्थिक दृष्टीने शेतकरी पूर्णपणे खचले असून झालेल्या नुकसानाची त्वरित भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली.
Kharip Sowing
Kharip SowingAgrowon

अमरावती : अतिवृष्टी (Extremely Heavy Rain) तसेच पूरस्थितीमुळे (Flood) शेतकऱ्यांवर दुबार तसेच तिबार पेरणीची वेळ आली आहे. जमीन खरडून गेल्याने हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी नुकसानभरपाईच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. या वेळी विभागीय कृषी सहसंचालकांना शेतकऱ्यांनी जाब सुद्धा विचारला.

माजी जिल्हापरिषद सदस्य प्रकाश साबळे यांच्या नेतृत्वात शेतकरी (Farmers) जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. याबाबत प्रकाश साबळे यांनी सांगितले, जून महिन्यात पावसाने दडी मारल्याने बियाणे (Seeds) उगवलेच नाहीत, निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांमुळे शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा दुबार पेरणीचे संकट ओढवले आणि आता अतिवृष्टी तसेच पुरामुळे पेरलेले बियाणे वाहून गेल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार, तिबार पेरणीचे संकट ओढवल्याचे त्यांनी सांगितले.

अतिवृष्टीमुळे (Extremely Heavy Rain) सोयाबीन, तूर, मूग, उडीद, कापूस आदी बियाणे जमिनीत दडपून गेले असून शेतकरी चिंतातूर झाले आहेत. आर्थिक दृष्टीने शेतकरी पूर्णपणे खचले असून झालेल्या नुकसानाची त्वरित भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली.

या वेळी प्रकाश साबळे, शेखर अवघड, समीर जवंजाळ, सचिन ठाकरे, विनायक टिपरे, ऐनुल्ला खान, उमेश वाकोडे, अक्षय साबळे, किरण महल्ले, योगेश बुंदिले, कार्तिक देशमुख, अतुल ढोके, सतीश खुळे, विशाल किटुकले यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

सुरुवातीला जूनमध्ये पावसाची दडी, निकृष्ट बियाणे आणि आता अतिवृष्टी पुरामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. त्यांना तातडीच्या मदतीची गरज असून प्रशासनाने त्वरित पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी आमची मागणी आहे.

- प्रकाश साबळे, माजी जिल्हापरिषद सदस्य

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com