चिपळूणमध्ये दुबार पेरणीचे संकट

सध्या तालुक्यातील विविध भागांत भातरोपांची लागवड झाली असली तरी खतांअभावी त्याची पुरेशी वाढ झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमधून खतांबाबतची ओरड सुरू झाली आहे.
Fertilizer
Fertilizer Agrowon

चिपळूण (जि. रत्नागिरी) ः तालुक्यात पाऊस (Rain) गायब झाल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीच्या (Resowing) संकटाची भीती निर्माण झाली आहे. त्यातच युरिया खताचा तुटवडा (Urea Fertilizer Shortage) आहे. खतांचा पुरवठा (Fertilizer Supply) न झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. याविषयी जिल्हाधिकाऱ्यांसह कृषी विभागाने (Department Of agriculture) न्याय देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

Fertilizer
खत लिंकिंगची सक्ती करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करावी

सध्या तालुक्यातील विविध भागांत भातरोपांची लागवड झाली असली तरी खतांअभावी त्याची पुरेशी वाढ झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमधून खतांबाबतची ओरड सुरू झाली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात युरिया उपलब्ध झाले असले तरी ठरावीक सोसायट्यांनाच ते पुरवण्यात आले. बहुतांश सोसायट्या वंचित राहिल्या. पावसाने पाठ फिरवल्याने आणि खतांअभावी दुबार पेरणीचे संकट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शेतकरी सोसायट्यांकडे खतांसाठी हेलपाटे मारत आहेत; परंतु कंपन्याकडूनच योग्य प्रमाणात पुरवठा होत नसून गेल्या आठवडाभरात एकदाही खताची गाडी आलेली नाही.

चिपळूण तालुका सहकारी खरेदी-विक्री संघातर्फे तालुक्यातील ४१ विविध कार्यकारी सोसायट्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बियाणे व खतांचे वितरण केले जाते. तालुक्यात भात बियाण्यांची ११०० क्विंटल मागणी आहे. त्यापैकी ९५० क्विंटल बियाणे प्राप्त झाले असून, त्यातील ७०० क्विंटल विविध कार्यकारी सोसायट्यांना वाटप झाले. गेल्या काही दिवसांपासून चिपळूण तालुक्यात खतच उपलब्ध होत नसल्यामुळे शेतकरी संकटात आला आहे. त्यातच पावसाने पाठ फिरवली आहे. चिपळूण तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाने या वर्षीसाठी सुमारे २४०० टन युरिया खताची, तर २२५ टन मिश्र खतांची संबंधित कंपन्यांकडे मागणी केली आहे. त्यापैकी सुमारे ५० टक्के शेतकऱ्यांना खतांचा पुरवठा करण्यात आला.

पावसाळ्याच्या सुरुवातीलाच तालुक्यातील शेतकऱ्यांना खताचा मुबलक पुरवठा व्हावा यासाठी आम्ही संबंधित कंपन्यांकडे वेळीच खतांची मागणी केली होती; मात्र खतांच्या कंपन्यांकडून योग्य पद्धतीने नियोजन न झाल्याने हा गोंधळ निर्माण झाला आहे. शेतकरी रोज मोठ्या संख्येने सोसायटीकडे खताची मागणी करू लागलेत; मात्र खत उपलब्ध नसल्याने त्यांना माघारी परतावे लागते. अजूनही तालुक्यात ६०० टन खतांची गरज आहे.
पांडुरंग कांबळे, व्यवस्थापक, चिपळूण तालुका खरेदी-विक्री संघ

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com