Kharif Sowing
Kharif SowingAgrowon

Kharif Sowing : दीड लाख हेक्टरवर दुबार पेरणीचे संकट

पावसाचा खंड पडल्याने जिल्ह्यातील दीड लाख हेक्टरवरील पेरणी बाद झाली आहे. त्यात सर्वाधिक क्षेत्र कापसाचे आहे. पावसाने पाठ फिरविल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे.

यवतमाळ : पावसाचा खंड (Rain Delayed In Kharif Season) पडल्याने जिल्ह्यातील दीड लाख हेक्टरवरील पेरणी बाद (Kharif Sowing) झाली आहे. त्यात सर्वाधिक क्षेत्र कापसाचे (Cotton Sowing Area) आहे. पावसाने पाठ फिरविल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट (Crisis Of Resowing) आले आहे. दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली असून, बियाणे खरेदीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. (Kharif Sowing Area In Maharashtra)

Kharif Sowing
पुणे जिल्ह्यात खरिपाच्या अवघ्या सात टक्के पेरण्या

जिल्ह्यात यंदा नऊ लाख हेक्टरवर खरीप हंगामातील पेरणीचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. यंदा कापसाच्या पेरणी क्षेत्रात वाढ झाली आहे. चार लाख हेक्टरवर कापसाची लागवड होणार आहे. शेतकऱ्यांना कल सोयाबीनकडे आहे. हवामान विभागाने यंदा मॉन्सून वेळेवर येईल, असा अंदाज वर्तविली होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीला सुरवात केली आहे. पेरणी झालेल्या क्षेत्रापैकी ९० टक्के क्षेत्रावर कापसाची लागवड झाली आहे. त्याला कृषी विभागानेही दुजोरा दिला आहे. ७५ मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असे आवाहन प्रशासन करीत आहेत. असे असले तरी अनेक शेतकऱ्यांची पेरणी आटोपली आहे.

Kharif Sowing
पुरेशा पावसाअभावी पेरणी लांबणीवर

जिल्ह्यात आतापर्यंत साडेतीन ते चार लाख हेक्टरवर पेरणी झाल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. पावसाने दांडी मारल्याने पिके संकटात सापडली आहेत. जवळपास दीड लाख हेक्टरवर दुबार पेरणीचे संकट आले आहे. जिल्ह्यात दररोज पावसाच्या सरी कोसळत आहे. मात्र, पावसापेक्षा उकाडा जास्त आहे. परिणामी जमिनीत ओलावा नाही. त्यामुळे बियाणे ‘जळत’ आहे. आतापर्यंत कपाशी पेरणीला फटका बसला आहे. शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे.

जिल्ह्यातील काही भागांत पावसाचे प्रमाण कमी आहे. काही भागांत हलका पाऊस झाला आहे. अजूनही पिकांना आवश्यक असलेला पाऊस झालेला नाही. त्याचा परिणाम पेरणी झालेल्या ठिकाणी दिसत आहे. पेरणी झालेल्या क्षेत्रापैकी दीड ते दोन लाख हेक्टरवर दुबार पेरणीची शक्यता नाकारता येत नाही.
डॉ. प्रमोद यादगीरवार, सहयोगी संशोधन संचालक, विभागीय कृषी संशोधन केंद्र, यवतमाळ.

कृषी केंद्रांत शेतकऱ्यांची गर्दी

पावसाअभावी पेरणी बाद होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. पेरणी बाद झालेल्या ठिकाणी पेरणीसाठी शेतकऱ्यांनी पुन्हा कंबर कसली आहे. बियाणे घेण्यासाठी शेतकऱ्यांची कृषी सेवा केंद्रांत गर्दी दिसत आहे.

पावसाचा अंदाज घेत पेरणी केली. हलका पाऊस आला. त्यामुळे पेरणी जमेल अशी आशा होती. मात्र, पेरणीनंतर पाऊस आला नाही. उकाडा वाढला आहे. त्याचा परिणाम पेरणीवर झाला आहे. पेरणी केलेले अर्धेक्षेत्रावरील बियाणे जळाले आहे. आता दुबार पेरणी हाच पर्याय आहे. अजूनही पावसाचा अंदाज दिसत नाही.
रमेश भोयर, शेतकरी, सोनुर्ली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com