
Grape Season पांगरी : पांगरी भागात द्राक्षे विक्रीचा हंगामात (Grape Season) सुरवात झाली असून खर्चाच्या तुलनेत द्राक्षास योग्य भाव (Grape Rate) मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
त्यात यावर्षीच्या पावसाळा कालावधीत अतिवृष्टी (Heavy Rain) झाल्याने द्राक्षे बागेस (Vineyard) फटाका बसला असताना देखील कष्ट आणि महागडी औषधाची फवारणी करत बागा सुस्थितीत आणल्या असताना ही द्राक्षांस समाधानकारक भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक घडी विस्कटती की काय अशी भीती निर्माण झाली आहे.
पांगरी भागास द्राक्षे आगार म्हणून ओळखले जात होते. मात्र मागील काही वर्षात पाऊस कमी झाल्याने पाणीटंचाई संकट निर्माण होऊन अनेकांनी द्राक्षे कुऱ्हाड लावावी लागली.
मात्र मागील चार पाच वर्षांत समाधानकारक पाऊस होऊन पाणी पातळीत चांगलीच वाढ झाल्याने अनेक शेतकरी पुन्हा द्राक्षे लागवडीचे वळले गेले.
पावसाळा कालावधीत परतीच्या जास्त झाल्याने बागेमध्ये पाणी साठून राहिल्याने वाफसा न झाल्याने ऑक्टोबर अखेरीस छाटणी करावी लागली. त्यामुळे एकाच वेळी द्राक्षे विक्रीस तयार होऊ लागली आहेत.
त्यात तापमानात चढउतार होत असून दिवसा ऊन आणि रात्री थंडी या परिणाम विक्रीवर होत आहे. या निर्माण झालेल्या वातावरणामुळे बाजारपेठेत मोठी मागणी होताना दिसत नाही. अर्थात या सर्व गोष्टींचा परिणाम द्राक्षे विक्रीवर होऊ लागला आहे.
द्राक्षे हे पैशांचे व एक रक्कमी पीक असल्याने शेतकऱ्यांचा ओढा वाढत असून नव्याने विकसित होत असलेल्या वाणाची लागवडीवर भर दिला जात आहे. यामध्ये माणिकचमन,एसएसएन,अनुष्का,एसएस या वाणाची लागवडी होत आहे.
सध्या द्राक्षे विक्री हंगामात सुरवात झाली असून खरेदीसाठी वणी, निजामाबाद, हिंगोली, नागपूर, हैद्राबाद आदी ठिकाणाचे व्यापारी ही दाखल झाले आहे. मात्र द्राक्षेस समाधानकारक भाव मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
द्राक्षाच्या खर्चाबाबत मजूर, अवजारे, खत,औषधाच्या किंमतीत भरमसाट वाढ झाली त्यामानाने द्राक्षाच्या भावामध्ये वाढ झाली नाही. वेळोवेळी वातावरणातील बदलामुळे बागांच्या खर्चामध्ये वाढ झाली. पूर्वी ३० टक्के खर्च तर ७० टक्के नफा असायचा. मात्र आताच्या काळात उलटे झाले आहे.
- बापूसाहेब वासकर (जुने द्राक्षे बागायतदार पांगरी)
शेतकऱ्यांनी माल काढणीस घाई करून नये.पुढील आठवड्यात वातावरण चांगले असल्याने दर राहतील अशी शक्यता आहे.शेतकऱ्यांनी व्यापाऱ्याची संपूर्ण माहिती घेतल्याशिवाय माल देऊ नये.अनुभवी व्यापाऱ्यास माल दिल्यास फसवणुकीच्या घटना घडणार नाहीत.
- लक्ष्मण बनसोडे (द्राक्षे बागायतदार पांगरी)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.