Onion Rate | Onion Today's Rate
Onion Rate | Onion Today's Rate Agrowon

Onion Market : ‘महावितरण’च्या वेळकाढूपणामुळे कांदा उत्पादकांवर संकट

एकीकडे रब्बी हंगामातील उन्हाळ कांदा लागवडीला गती आली आहे. अशा परिस्थितीत लागवडी झाल्यानंतर कांदा पिकाला पाणी देणे अत्यावश्यक आहे.

नाशिक : एकीकडे रब्बी हंगामातील उन्हाळ कांदा लागवडीला (Onion Cultivation) गती आली आहे. अशा परिस्थितीत लागवडी झाल्यानंतर कांदा पिकाला पाणी देणे अत्यावश्यक आहे. मात्र रविवारी (ता. १८) सटाणा तालुक्यातील ब्राह्मणपाडे येथील भउरदर शिवारातील क्र.२४ च्या रोहित्रात बिघाड (Transformer) झाल्याने कृषीपंपांना (Agriculture Pump) वीजपुरवठा (Power Supply) नसल्याची स्थिती होती.

Onion Rate | Onion Today's Rate
Onion Market : चाकणला नवीन कांदा दाखल

यावर शेतकऱ्यांनी महावितरणकडे रीतसर तक्रार केली; मात्र वेळेवर कार्यवाही न झाल्याने रोहित्र बदलण्यात आले नाही. परिणामी लागवडीनंतर कांदा पिकाला वेळेवर सिंचन न झाल्याने कोवळी रोपे जळून गेल्याने ऐन हंगामात संकट कोसळले आहे.

Onion Rate | Onion Today's Rate
Onion Export : कांद्याची नाफेडकडून खरेदी वाढवा

रविवारी (ता. १८) परिसरात शेतकऱ्यांच्या उन्हाळ कांदा लागवडी असताना रोहित्रात बिघाड झाला. शेतकऱ्यांनी याबाबत महावितरणला कळवून त्यावर उपाययोजना करण्याची मागणी केली. यावर नादुरुस्त रोहित्र सोमवारी (ता. १९) जमा केली. पुढच्या दिवशी मंगळवारी (ता. २०) दुसरे रोहित्र मिळाले; मात्र तेही सदोष निघाल्याने बुधवारी (ता. २१) वीजपुरवठा झालेला नाही. त्यामुळे कांदा लागवडही वाया गेली आहे. यामध्ये रमेश सीताराम बोरसे, संजय धोंडू अहिरे, दगा धोंडू अहिरे, नितीन नथू बोरसे यांचे नुकसान झाले.

Onion Rate | Onion Today's Rate
Onion Cultivation : निफाड तालुक्यात उन्हाळ कांदा लागवड सुरू

गुरुवार (ता. २२) पुन्हा मजूर लावून शेतकऱ्यांनी कांदा लागवड सुरू केली. गुरुवारी हे रोहित्र सुरू झालेले नव्हते. मात्र मजूर टंचाई असल्याने हंगामात लागवडी थांबविता येत नव्हत्या. त्यानंतर शुक्रवारपर्यंत हा वेळकाढूपणा सुरूच होता. यावर शेतकऱ्यांनी जायखेडा येथील उपकेंद्राचे कनिष्ट अभियंता यांच्याशी संपर्क करत होते; मात्र योग्य तो प्रतिसाद मिळत नव्हता.

देऊ असे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रकार झाला. त्यामुळे अशा प्रकारचे महावितरणकडून होणारे कामकाज शेतकऱ्यांना अडचणींत आणणारे ठरले आहे. यामागे कोण अधिकारी जबाबदार आहे, शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे सरकार कधी पाहणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

महावितरणचे कामकाज ‘वरातीमागून घोडे’....

शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, या पार्श्‍वभूमीवर शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांनतर शुक्रवारी (ता. २३) महावितरण अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. तत्काळ कार्यवाही करत अखेर शनिवारी (ता. २४) रोहित्र दाखल झाले; मात्र शेतकऱ्यांना अगोदर जो फटका बसला, मनस्ताप झाला. याची जबाबदारी कोण घेणार, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे महवितरणचे कामकाज म्हणजे ‘वरातीमागून घोडे’ अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे.

वीजपुरवठा वेळेवर न झाल्याने माझ्यासह ४ शेतकऱ्याचे कांदा पीक जाळले आहे. त्यामुळे लगवड उपटून नवीन लागवड करावी लागणार आहे. महावितरणकडे पाठपुरावा केल्यानंतर उडवाउडवीची उत्तरे दिली गेली. त्यांनतर सदोष रोहित्र दिले, असे वागणे म्हणजे अडचणीत आणण्याचा प्रकार आहे. एकरी लागवड १५ हजार फक्त लागवड खर्च झाला. त्यामुळे आमचे नुकसान झाल्याने महावितरणने नुकसान भरपाई द्यावी.

- रमेश बोरसे, नुकसानग्रस्त शेतकरी ब्राह्मणपाडे, ता. सटाणा.

चार ते पाच शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यानंतर महावितरणकडे पाठपुरावा केला; मात्र अखेर आंदोलनाची भाषा वापरल्याने अखेर रोहित्र दिले. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने भरपाई द्यावी.

- अभिमान पगार, उत्तर महाराष्ट्र प्रमुख-महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com