Crop Damage : सिंधुदुर्गातील शेती, बागायतीसमोर गव्यांचे संकट

जिल्ह्यात गव्यांकडून सतत होत असलेल्या शेती आणि बागायतीच्या नुकसानीमुळे जिल्ह्यातील भात, नाचणीसोबत भाजीपाला, आंबा, काजू, बांबूसह सर्वच पिके अडचणीत आली आहेत.
 Crop Damage
Crop DamageAgrowon

सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यात गव्यांकडून (Gawa) सतत होत असलेल्या शेती आणि बागायतीच्या नुकसानीमुळे (Crop Damage) जिल्ह्यातील भात, नाचणीसोबत भाजीपाला, आंबा, काजू, बांबूसह सर्वच पिके अडचणीत आली आहेत. आतापर्यंत काही मोजक्या गावांत नुकसान करणाऱ्या गव्यांचे कळप आता जिल्ह्याच्या बहुतांश गावांत पोहोचले असून गव्यांना रोखण्यासाठी कोणताही सक्षम पर्याय नसल्यामुळे शेतकरी हतबल आहेत.

 Crop Damage
Crop Damage : हाती पैसा नसल्याने दिवाळी अंधारात

जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील काही गावांमध्ये हत्तींच्या उपद्रवामुळे तेथील शेतकरी हैराण आहेत. परंतु या हत्तींचा उपद्रव काही मोजक्या गावांपुरताच आहे. परंतु त्यापेक्षा अधिक मोठे संकट गव्यांच्या रूपाने जिल्ह्यातील शेती बागायतीवर ओढवले आहे. आतापर्यंत डोंगर आणि घनदाट जंगल परिसरातील गावांमध्ये वावरणाऱ्या गव्यांचे कळप आता जिल्ह्यातील २५० हून अधिक गावांमध्ये पोहोचले आहेत. यापूर्वी भात, नाचणीचे नुकसान गवे करीत होते. परंतु आता आंबा, काजूचे नुकसानदेखील करू लागले आहेत. भाजीपाला, रब्बी पिकेदेखील गवे उद्ध्वस्त करू लागले आहेत. याशिवाय गव्यांकडून शेतकऱ्यांवर हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. गव्यांना रोखणारी कोणतीही सक्षम यंत्रणा नसल्यामुळे शेतकरी हतबल आहेत.

 Crop Damage
Crop Damage : संमदच मातीत गेलय, सालभर कसं धकवायचं

गव्यांची संख्या तीन ते चार हजारांपर्यंत असू शकते. प्राणी परिसंस्थेमध्ये मोठा प्राणी लहान प्राण्यांना खातो. परंतु, गव्यांना मारण्याची क्षमता फक्त पट्टेरी वाघामध्येच आहे. सिंधुदुर्गात पट्टेरी वाघ नाही. याशिवाय कोळसुंदे गव्यांना मारतात. परंतु त्यांचे प्रमाण नगण्य आहे. याशिवाय गवे कळपांनी राहत असल्यामुळे त्यांच्यावर सहजासहजी अन्य प्राण्यांना हल्ला करणे शक्य होत नाही. त्यामुळे गव्यांचे प्रमाण वाढतच आहे. एका कळपात दहा ते पंधरा गवे असतात. हे गवे शेतात गेल्यानंतर ते पूर्ण शेतच उद्ध्वस्त करतात.

 Crop Damage
Crop Damage : यंदा वऱ्हाडात १०० टक्क्यांवर पाऊस

गव्यांनी केलेले नुकसान

२०१५-१६ ८६६ ८,१०,९२४२

२०१६-१७ ८९० ८,८२,०२४४

२०१७-१८ ८६० ५,९१,३४९२

२०१८-१९ १०१० ८,०८,८६९१

२०१९-२० ९९९ ८,६२,७१९३

२०२०-२१ १७ १८,१९४१

२०२१-२२ ६७९ ५,५१,६७८८

एकूण ६३४८ ५९,०७,६११२

कणकवली, वैभववाडी तालुक्यांसह अन्य भागांत गव्यांचा वावर वाढला आहे. गव्यांचे प्रमाणदेखील वाढले असून शेतीचे नुकसान होत आहे, ही वस्तुस्थिती आहे. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान होते त्यांनी वन विभागाकडे प्रस्ताव द्यावेत. त्यांना मदत दिली जाईल.

- राजेंद्र गुणकेकर,

वनक्षेत्रपाल, वन विभाग कणकवली.

आतापर्यंत गवे भात, नाचणी पिकांचे नुकसान करीत होते. परंतु आता नव्याने लागवड केलेल्या आंबा, काजू, बांबूच्या रोपांचेदेखील नुकसान करीत आहेत. वन विभाग गव्यांना प्रतिबंध करू शकत नाही ही अगतिकता आहे. नुकसानभरपाईचे निकष आणि दिली जाणारी मदत तुटपुंजी आहे. शासनाने मदतीच्या रकमेत वाढ करावी.

- मंगेश सुद, शेतकरी, खांबाळे.

अशी मिळते नुकसान भरपाई (रुपयांमध्ये)

प्रति गुंठा भात पीक - ३६२, नाचणी - ३६२, ऊस - ५५०.

फळझाडे प्रतिझाड - आंबा - ५००, काजू - ५००, नारळ - २०००,

बांबू प्रति नग - १०.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com