Crop Damage : वादळी पाऊस, गारपिटीने पिकांची धुळधाण

राज्यात गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेले वादळी पाऊस, गारपिटीचे सावट कायम आहे.
Crop Damage
Crop DamageAgrowon

Pune News राज्यात गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेले वादळी पाऊस, गारपिटीचे (Hailstorm) सावट कायम आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भासह राज्याच्या विविध भागांत सततच्या पाऊस आणि गारांच्या माऱ्यामुळे रब्बी पाठोपाठ, उन्हाळी पिकांचे नव्हते झाले आहे. भाजीपाला, फळपिकांसह रब्बी आणि उन्हाळी पिकांची धुळधाण (Crop Damage) झाली आहे.

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर या पाचही जिल्ह्यांत शनिवारी (ता. २९) सकाळपर्यंतच्या २४ तासांत वादळी पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे आंबा, मोसंबी, चिकू, अंजीर या फळपिकांसह काढणीच्या अंतिम टप्प्यातील रब्बी व उन्हाळी पिकांची मोठी नासाडी झाली आहे. छोट्या नद्या व ओढ्यांना पूर आला.

नगर जिल्ह्यात वादळी पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे. शुक्रवारी (ता.२८) दिवसभरात दोन वेळा पाऊस कोसळला. काही ठिकाणी गारपीट होत आहे.

सततच्या पावसाने पिकांची हानी सुरू आहे. नगर, राहाता, नेवासा, पारनेर, राहुरी, शेवगाव, कोपरगाव, संगमनेर तालुक्याला शुक्रवारी पावसाने तडाखा बसला.

म्हसले (ता. नेवासा) येथे वीज पडून एका दहा वर्षीय मुलाचा, तर जामखेड तालुक्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. रब्बी बाजरी, मका, ज्वारी, कांदा, सोयाबीन, आंबा, डाळिंब पिकांचे नुकसान झाले.

Crop Damage
Crop Damage Survey : खानदेशात पीकहानीचे पंचनामे सुरूच

खानदेशात पावसामुळे शुक्रवारी (ता. २८) मोठी पीकहानी झाली आहे. फळपिकांची होत्याचे नव्हते, अशी स्थिती झाली आहे.

केळी, मका, कांदा व बाजरीचे प्रचंड नुकसान झाले आहे. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात वादळी पाऊस झाला. कलाली, निम (ता. अमळनेर) येथे केळीचे मोठे नुकसान झाले.

जळगाव, धरणगाव, चोपडा, जामनेर, एरंडोल, पारोळा, धुळ्यातील शिरपूर, शिंदखेडा आदी भागांत जोरदार पाऊस झाला. त्यामुळे मळणीवर आलेला मका, बाजरी, केळी, कांदा आदी पिकांची मोठी हानी झाली. शेकडो हेक्टरवरील केळी भुईसपाट झाली.

Crop Damage
Crop Damage Survey : खानदेशात पीकहानीचे पंचनामे सुरूच

शनिवारी (ता. २९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात झालेला पाऊस, मि.मीमध्ये (स्रोत : हवामान अंदाज)

मध्य महाराष्ट्र : धुळे ७०, पारोळा ५०, सोलापूर ४०, राहुरी, एरंडोल, शेवगाव, जामनेर, बोधवड प्रत्येकी २०, रावेर, येवला, मुक्ताईनगर, चोपडा, सटाणा, येवला, जळगाव, भुसावळ, मोहोळ, भडगाव, साक्री, चाळीसगाव प्रत्येकी १०.

मराठवाडा : बीड ७०, निलंगा ६०, देवणी ५०, पैठण, औसा प्रत्येकी ४०, खुलताबाद, सोयगाव, शिरूर अनंतपाळ, सिल्लोड प्रत्येकी ३०, गंगापूर, संभाजीनगर, धाराशिव, वैजापूर, लातूर प्रत्येकी २०, फुलंब्री, चाकूर, उदगीर प्रत्येकी १०.

विदर्भ : गोरेगाव ३०, आमगाव, साकोली, सडक अर्जूनी, बुलडाणा प्रत्येकी २०, सालकेसा, चिखली, भंडारा, लाखणी, तिरोरा, गोंदिया, कुही, कामठी, रामटेक, मोताळा, देऊळगाव राजा, चिमूर, सिंदखेड राजा, जळगाव जामोद, मेहकर, संग्रामपूर, नंदूरा प्रत्येकी १०.

Crop Damage
Hailstorm Crop Damage : राज्यात वादळी पाऊस, गारपिटीचे सत्र सुरूच

नाशिकसह खानदेशात जोरदार तडाखा

वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपिटीने नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी (ता.२८) सटाणा, निफाड, मालेगाव व सिन्नर या तालुक्यांत हाहाकार उडाला आहे. कळवण तालुक्यात पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

सटाणा तालुक्यात उत्तर भागात जोरदार वाऱ्याच्या पावसासह गारपीट झाली. डाळिंब, द्राक्ष कांदा व भाजीपाला पिकांचे अतोनात नुकसान झाले. खानदेशातही फळपिकांसह रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले.

राज्यातील पाऊस स्थिती अशी...

- मराठवाड्यात वादळी पावसाचा जोर कायम

- जोरदार पावसाने ओढे, नाल्यांना पूर

- नगरमध्ये दोघांचा मृत्यू; पिकांची हानी वाढली

- खानदेशात फळ पिकांचे होत्याचे नव्हते

- शेकडो हेक्टर केळी बागा भुईसपाट

- नाशिकमध्ये पाऊस, गारपिटीने हाहाकार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com