Crop Damage : दानापूर परिसरात पिकांचे नुकसान

यंदा तेल्हारा तालुक्यात सातत्याने पाऊस होत असल्याने पिके सतत पाण्याखाली राहत आहेत. ही आपत्ती मोठी असून आता कपाशीच्या पाठोपाठ सोयाबीनचेही नुकसान होऊ लागले आहे.
Crop Damage
Crop DamageAgrowon

दानापूर, जि. अकोलाः यंदा तेल्हारा तालुक्यात सातत्याने पाऊस (Rain Update) होत असल्याने पिके सतत पाण्याखाली राहत आहेत. ही आपत्ती मोठी असून आता कपाशीच्या पाठोपाठ सोयाबीनचेही नुकसान (Soybean Crop Damage) होऊ लागले आहे. मूग, उडदाचे पीक (Urad Crop Damage) आधीच हातातून गेल्यासारखे झालेले आहे. दानापूर परिसरात सतत पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे.

Crop Damage
Crop Damage : यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टी भरपाईसाठी ५२९ कोटींचा निधी

जून महिन्यात लागवड केलेल्या कपाशीच्या पिकात परिपक्व झालेले बोंड काळे पडले. काही बोंडातील सरकीला कोंब आले. तीच परिस्थिती सोयाबीनची झाली आहे. शेंगा काळ्या पडून परिपक्व दाणे अंकुरले आहेत. दानापूर हे गाव भाजीपाला उत्पादनात अग्रेसर समजले जाते. संततधार पावसाने भाजीपाला उत्पादकांना हजारोंचा फटका दिला. दानापूर परिसरात असलेल्या सौंदळा, वारी भैरवगड, वारखेड, चांगलवाडी, सोगोडा, हिंगणी, बोरखेड या परिसरात जोरदार पाऊस झाला आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्ग हिरावून घेतोय की काय अशी परिस्थिती बनली आहे.

माळेगाव मंडलात तीन हजार आठ हेक्टर कपाशी, तर सोयाबीनचा सुमारे अडीच हजार हेक्टरवर पेरा आहे. कपाशी ही प्री-मॉन्सून असल्याने दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या घरात पांढरे सोने दाखल झाले असते. आता मात्र पावसामुळे चांगल्या दर्जाचा पहिला कापूस येण्याची शक्यता संपुष्टात आली आहे. शासनाकडून त्वरीत पंचनामे करून सरसकट मदतीची मागणी शेतकरी करीत आहेत.

मी चार एकरांत कपाशीची लागवड केली आहे. मला एक लाख १० हजार रुपये खर्च आला आहे. माझ्या कपाशीच्या झाडांवर ४० ते ५० बोंड लागलेले होते. मात्र सतत सुरू असलेल्या पावसाने बोंड कुजत आहेत. काही बोंडातून कोंब निघाले. परिणामी, उत्पादनात घट दिसत आहे.

- रामकिशोर घायल,

शेतकरी, दानापूर, जि. अकोला

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com