Crop Damage : पिकांवर फिरले परतीच्या पावसाने पाणी

खानदेशात परतीच्या पावसाने अक्षरशः थैमान घातले असून, तोंडाशी आलेल्या खरीप उत्पादनावर पाणी फिरवले आहे.
Crop Damage
Crop DamageAgrowon

जळगाव/पाचोरा : खानदेशात परतीच्या पावसाने अक्षरशः थैमान (Heavy Rain Jalgaon) घातले असून, तोंडाशी आलेल्या खरीप उत्पादनावर (Kharif Crop) पाणी फिरवले (Crop Damage) आहे. यामुळे बळीराजाचे आर्थिक व मानसिक बळ संपुष्टात आले असून, शासनाने बळीराजाला पुन्हा दमदारपणे उभे करण्यासाठी पंचनामे, अहवाल अशी प्रक्रिया न करता सरसकट नुकसान भरपाई (Crop Damage Compensation) द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

या वर्षी रोहिणी नक्षत्र कोरडे गेले असले तरी मृग नक्षत्रापासून पावसाने योग्य प्रमाणात व वेळेवर हजेरी लावली. बहुतांश पेरण्या मृग नक्षत्रातच पूर्ण झाल्या होत्या. कापूस पिकाचा पेरा सर्वाधिक होता व पिकेही चांगली होती. त्यामुळे यंदा चांगले उत्पादन येईल, अशी अपेक्षा होती. परंतु या खरीप उत्पादनाला पावसाची दृष्ट लागली.

Crop Damage
Crop Damage : पावसामुळे ३६ लाख हेक्टर पिके मातीमोल

कापूस वेचणी, सोयाबीन, मका, ज्वारी, बाजरी काढणीची कामे सुरू असताना व खरिपाचा शेतीमाल शेतातून घरी आणण्याची वेळ असताना परतीच्या पावसाने अक्षरशः थैमान घातले. धुळे, नंदुरबार व जळगावात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. जळगावात तब्बल १२५ टक्के पाऊस झाला आहे. गेल्या आठवडाभरापासून कमी जास्त प्रमाणात सर्वत्र परतीचा पाऊस होत असल्याने खरीप उत्पादनावर पाणी फिरले आहे.

Crop Damage
Crop Damage : पावसाने उडवली झोप

कापूस ओला झाला असून, उर्वरित कैऱ्या सडल्या आहेत. सोयाबीन व मका कापून ठेवल्याने त्यास कोंब फुटू लागले आहेत. ओले झालेले धान्य व कापूस वाळवण्या इतपत ऊन नाही. तसेच ओला झालेला व सडलेला शेतीमाल व्यापारी अत्यंत कमी भावात मागत आहेत. त्यामुळे ऐन दिवाळीच्या आनंदात शेतकऱ्यांवर नुकसानीचे दुःख कोसळले आहे.

शासनाने या नुकसानीची दखल घेऊन पंचनामे, नुकसान भरपाईचा अहवाल या प्रक्रियेच्या भानगडीत न पडता बळीराजाला पुन्हा उभे करण्यासाठी इतर राज्यातील पॅटर्न प्रमाणे महाराष्ट्रात सरसकट नुकसानभरपाई देण्याचे धोरण राबवावे व त्वरित नुकसान भरपाई द्यावी. त्यामुळे निदान शेतकऱ्याला रब्बीच्या आशेवर तरी जगता येईल, असा सूर व्यक्त होत आहे.

या वर्षी आतापर्यंत खरीप उत्पादनाची पिके चांगली होती. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांवरील आर्थिक संकट नष्ट होईल, अशी अपेक्षा होती. परंतु परतीच्या पावसाने होत्याचे नव्हते केले. शेतकरी आर्थिक गर्तेत अडकला असून, शासनाने सरसकट नुकसान भरपाईचे धोरण त्वरित राबवावे.
दगाची वाघ, शेतकरी, राणीचे बांबरुड, ता. पाचोरा, जि. जळगाव
शेतकऱ्यांवरील आर्थिक समस्या जायला तयार नाही. पिकांचे उत्पादन कसे घ्यावे, हा प्रश्‍न आहे. शेतकऱ्याला मदत जाहीर झालेली नाही. सरसकट पंचनामे सुरू नाहीत. शासनाकडून आदेश नाहीत. वित्तीय मदतीशिवाय शेतकरी पुढे उभा राहू शकणार नाही.
दिलीप निझरे, लोंढरे, ता. शहादा, जि. नंदुरबार

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com