Heavy Rainfall : नुकसानीत दिवसागणिक पडते भर

परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ७५ मंडलात सोमवारी (ता. १७) सकाळी आठ पर्यंतच्या २४ तासांत हलका ते जोरदार पाऊस झाला. परतीचा पाऊस जाता-जाता जोरदार तडाखा देत आहे.
Heavy Rainfall : नुकसानीत दिवसागणिक पडते भर

परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ७५ मंडलात सोमवारी (ता. १७) सकाळी आठ पर्यंतच्या २४ तासांत हलका ते जोरदार पाऊस (Heavy Rainfall) झाला. परतीचा पाऊस जाता-जाता जोरदार तडाखा देत आहे. या दोन जिल्ह्यात काही तास, एक दिवस उघडिपीनंतर परत पाऊस येत आहे. पावसात मोठा खंड नसल्यामुळे सुगीची (Crop Damage) कामे वारंवार खोळंबत आहेत.

Heavy Rainfall : नुकसानीत दिवसागणिक पडते भर
Crop Damage : नुकसानीचे सरसकट पंचनामे करा

पीकनुकसानीत दिवसागणिक भर पडत आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. परभणी जिल्ह्यात शुक्रवारी (ता. १४) मुसळधार पाऊस झाल्यानंतर शनिवारी (ता. १५) उघडीप दिली. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. सुगीची कामे सुरु झाली. परंतु रविवारी (ता. १६) दुपारपासून जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, पालम, पूर्णा तालुक्यातील अनेक मंडलात जोरदार पाऊस झाला गेल्या २४ तासांत जिल्ह्यातील ४५ मंडलात सरासरी ६.१ मिमी, ऑक्टोंबर महिन्यात सरासरी ८८.२ मिमी, १ जून पासून आजवर ७३८.६ मिमी पाऊस झाला.

हिंगोली जिल्ह्यातील ३० मंडलात हलका ते जोरदार पाऊस झाला. हिंगोली, कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ, सेनगाव तालुक्यातील अनेक मंडलात पावसाचा जोर होता. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी ९.६ मिमी, ऑक्टोंबर महिन्यात सरासरी १३९.५ मिमी, १ जून पासून आजवर १०२५.१ मिमी पाऊस झाला.

मंडलनिहाय पाऊस (मिमीमध्ये)

परभणी जिल्हा ः जिंतूर ९.३,सावंगी म्हाळसा ६.८, बामणी ६.८, बोरी २५.८, आडगाव १४.८, वाघी धानोरा १०.८, वालूर ६.३, चिकलठाणा ९.८, केकरजवळा ७.३, रामपुरी ९.५, पाथरी २३.३, बाभळगाव ५१, हादगाव २२, कासापुरी २३.२, सोनपेठ ७.५, वडगाव ७.५, चाटोरी १६.५.

हिंगोली जिल्हा ः हिंगोली ६.३, नरसी नामदेव ११.३, डिग्रस कऱ्हाळे १३, नांदापूर २८, आखाडा बाळापूर १६.८, डोंगरकडा ७, वसमत १०, आंबा १८.५, टेंभुर्णी ७.५, कुरुंदा १८.५, औंढा नागनाथ १३.३, येळेगाव १३, साळणा १४.८, जवळा बाजार २४.८, सेनगाव ६.८, आजेगाव ६, साखरा १२.३, पानकन्हेरगाव १६.३, हत्ता १८.३.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com