Rain Update : दानापूर परिसराला पाऊस, वादळाचा तडाखा

तेल्हारा तालुक्यातील दानापूर परिसरात आलेल्या वादळी पावसाने मोठ्या प्रमाणावर केळी, कपाशी, सोयाबीन, पपई तसेच भाजीपालावर्गीय पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
Crop Damage
Crop DamageAgrowon

दानापूर, जि. अकोला ः तेल्हारा तालुक्यातील दानापूर परिसरात आलेल्या वादळी पावसाने (Heavy Rainfall) मोठ्या प्रमाणावर केळी, कपाशी, सोयाबीन, पपई तसेच भाजीपालावर्गीय पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान (Crop Damage Due To Heavy Rain Akola) झाले. शुक्रवारी (ता. ९) सायंकाळी या भागात पावसाने थैमान घातले.

Crop Damage
Crop Damage : शेतात मातीच उरली नाही, शेती करू कशी?

सायंकाळच्या सुमारास आलेल्या पाऊस व जोरदार वादळामुळे केळीबागांचे नुकसान झाले. कपाशी, पानपिंपरी, पपईलाही फटका बसला. या नुकसानाचा प्राथमिक अहवाल तलाठी अंकुश मानकर व कृषी सहायक महेश इंगळे यांनी केले आहे. पंजाब जायले, विठ्ठल जायले, सुरेश दामधर, सूर्यकांत वैलकर, वसंत राऊत, सुरेश कुऱ्हाडे, शालीग्राम मिसाळ, नंदकिशोर राऊत, महादेव दामधर या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.

दानापूर- वडगाव वाण रस्ता बंद

पाऊस व जोरदार वादळी वाऱ्याने दानापूर ते वडगाव वाण रस्त्यावर अनेक ठिकाणी झाडे कोसळली. विजेचे खांब पडल्याने परिसरातील वीज बंद झाली. रात्रभर नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागला.

मी मोठा खर्च करून कपाशीची लागवड केली आहे. शुक्रवारी झालेल्या वादळ, पावसाने पिके झोपली गेली. परिपक्व झालेली बोंडे गळाली.
सुरेश दामधर, शेतकरी, दानापूर, जि. अकोला

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com