Unseasonal Rain : वादळी पाऊस, गारपिटीचा हाहाकार सुरूच

नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात शुक्रवारी (ता. १७) पावसाने जोरदार हजेरी लावली. प्रामुख्याने पन्हाळे गावाच्या परिसरात गारपिटीचा मोठा तडाखा बसला.
Crop Damage
Crop Damage Agrowon

Unseasonal Rain पुणे : राज्याच्या विविध भागांत वादळी वारे, मेघगर्जना, विजांसह पावसाने (Heavy Rain) हजेरी लावली आहे. जोरदार वारे, पाऊस आणि गारपिटीने (Hailstorm) पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान (Crop Damage) झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.

शनिवारी (ता. १८) दुपारपासूनच पावसाला सुरुवात झाली होती. परभणी आणि बीडसह मराठवाड्यात, तसेच नगर जिल्ह्यात गारपीट झाली.

नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात शुक्रवारी (ता. १७) पावसाने जोरदार हजेरी लावली. प्रामुख्याने पन्हाळे गावाच्या परिसरात गारपिटीचा मोठा तडाखा बसला.

तर रायपूर, निंबाळे, भारतनगर, भडाणे, निमोण परिसरात जोरदार पाऊस झाला. कसमादे पट्ट्यातील सटाणा, कळवण, नांदगाव, मालेगाव, तालुक्यात वादळी वारा व विजांच्या कडकडाटाने जोरदार हजेरी लावली.

या भागात प्रामुख्याने गहू, लेट खरीप व रब्बी हंगामातील उन्हाळ कांद्याला मोठा फटका बसला आहे. जोरदार झालेल्या गारपिटीमुळे शेतात अक्षरशः गारांचा खच पडला होता.

वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने उन्हाळी कांदा लागवडी काढणीला आलेल्या गहू, द्राक्ष, डाळिंबाचे नुकसान झाले. तसेच खळ्यावर रचलेले भात, नागली आदी मुख्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

शेतकऱ्यांनी घरगुती कांदा बीज उत्पादन घेतलेले डेंगळे तुटून पडल्याने कांदा बीज उत्पादनावरही मोठा परिणाम होणार आहे. नांदगाव तालुक्यात हिरेनगर येथे वीज पडून गाय, वासरू, धोंडेगावात वीज पडून बैल जोडी मृत्युमुखी पडली.

Crop Damage
Mango Crop Damage : आंब्याला वादळी पावसाचा फटका

मराठवाड्यात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाचा जोर कायम होता. काही ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे आता तोंडाशी आलेल्या रब्बीतील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

सोयगाव मंडलातील कंकराळा, जरंडी, निंबायती, बहुलखेडा, कवली, तिखी-उमर-विहिरे-निमखेडी, नांदगाव तांडा, सावरखेड, लेनापूर आणि दत्तवाडी या गावांना शुक्रवारी दुपारनंतर गारपिटीचा तडाखा बसला. या पावसामुळे काढणीला आलेली ज्वारी, गहू, हरभरा, आंबा, द्राक्षे पिकाचेही मोठे नुकसान झाले.

वाशीम जिल्ह्यातील रामराववाडी, पिंपळशेंडा परिसरांत गारांसह पाऊस झाल्याने गहू, हरभरा, लिंबू, आंबा, कांदा, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. लिंबाच्या आकाराची गार पडल्याचे वृत्त आहे.

किन्हीराजासह पिंपळशेंडा रामराववाडी, कुत्तरडोह, माळेगाव, अमानवाडी परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला. या भागात गारपीट व अवकाळी पावसाने नुकसान झाले आहे.

Crop Damage
Crop Damage: पुन्हा गारांचा सडा; शेतकरी मेटाकुटीला

परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील अनेक मंडलांत शनिवारी सकाळपर्यंत वादळी वारे, विजांच्या कडकडाटात हलका ते मध्यम पाऊस झाला.

शुक्रवारी (ता. १७) दुपारी तीननंतर परभणी जिल्ह्यातील परभणी, गंगाखेड, पूर्णा आणि हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात झालेल्या गारपिटीमुळे हजारो हेक्टरवरील गहू, ज्वारी, हरभरा, कांदा बीजोत्पादन पीक, केळी, आंबा, संत्रा, मोसंबी, चिकू, टरबूज, खरबूज यासह शेवगा भाजीपाला पिकांची नासाडी झाली.

वीज कोसळून परभणी जिल्ह्यातील तीन तालुक्यांतील चार जणांचा मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाले. काही ठिकाणी जनावरे दगावली आहेत.

- परभणी, बीडसह नगरमध्ये गारपीट

- नाशिक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह हजेरी

- वाशीममध्ये गारांसह पाऊस

- परभणी, हिंगोलीत फळ, भाजीपाला पिकांची नासाडी

- मराठवाड्यत सलग तिसऱ्या दिवशी पावसाचा जोर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com