Crop Damage : सोयगाव तालुक्यात वादळी वाऱ्यात पिके आडवी

दोन दिवसांपासून वातावरण बदलामुळे वादळी वाऱ्याचा तडाखा सुरू झालेला आहे. यामध्ये ऐन कापणीवर आलेल्या मका, ज्वारी, बाजरी, सूर्यफूल आदी पिके आडवी पडून नुकसान होत आहे.
Crop Loss
Crop Loss Agrowon

सोयगाव ः सोयगावसह तालुक्यात पुन्हा वादळी वाऱ्याचा तडाखा (storm) बसल्याने सोयगाव तालुक्यात (Soygon) रब्बीची पिके (Rabbi Crop Loss) आडवी पडली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान (Farmer) झाले असून महसूल आणि कृषीच्या पथकांनी जंगली कोठा शिवारात शुक्रवारी पाहणी केली.

तालुक्यात दोन दिवसांपासून वातावरण बदलामुळे वादळी वाऱ्याचा तडाखा सुरू झालेला आहे. यामध्ये ऐन कापणीवर आलेल्या मका (Maize), ज्वारी (Jwari), बाजरी, सूर्यफूल (Sun follower) आदी पिके आडवी पडून नुकसान होत आहे.

दरम्यान सोयगाव तालुक्यात गुरुवार आणि शुक्रवार दोन दिवस वादळाचा तडाखा बसला आहे. यामध्ये बनोटी मंडळातील बोरमाळ तांडा, जंगलीकोठा आणि निमखेडी शिवारात मोठे नुकसान झाले आहे.

Crop Loss
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात वादळ वाऱ्यासह पावसाने फळपिकांचे नुकसान

सोयगाव, जरंडी या दोन मंडळांनाही वादळी वाऱ्याचा फटका बसलेला असल्याने मका, शाळू सूर्यफूल आदी पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहे.

एकीकडे अतिवृष्टीच्या नुकसानीचा निधी मिळेना तर दुसरीकडे रब्बीचे उत्पन्न निसर्ग हाती येई देईना! अशीच स्थिती सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची झाली आहे. दरम्यान महसूल आणि कृषीच्या पथकांनी शुक्रवारपासून नुकसानीची पाहणी सुरू केली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com