Crop Damage : छत्रपती सभांजीनगरमध्ये वादळी पावसाचा दणका

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गुरुवारी (ता. २०) अनेक ठिकाणी जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली.
Crop Damage
Crop DamageAgrowon

Chhatrapati Sambhaji Nagar News जिल्ह्यात गुरुवारी (ता. २०) अनेक ठिकाणी जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. त्यामुळे काढणीला आलेल्या पिकांसह फळपिकांचे मोठे नुकसान (Crop Damage) झाले.

फुलंब्री शहरासह तालुक्यात वादळी पावसाने मोठे नुकसान झाले. यापूर्वीच्या पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे काही भागांत करण्यात आले आहेत. परंतु अजूनही अनेक भागातील शेतकरी पंचनाम्यांपासून वंचित आहेत. त्यात गुरुवारच्या पावसाने नुकसानीत भर घातली.

सोयगाव तालुक्यात निंबायती गावात एका घरावर, तर घोसला भागात रस्त्यावर झाड कोसळले. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली. निंबायती, बहुलखेडा, कवली, निमखेडी, उमर विहिरे, घोसला, जरंडी या गावांना तडाखा बसला. त्यात झाड कोसळून जितेंद्र वाघ यांच्या घराचे नुकसान झाले.

Crop Damage
Crop Damage Survey Update : पिकांच्या पंचनाम्याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष

कन्नड तालुक्यातील नाचनवेल, भीलदरी, परिसरात मका, बाजरी, गहू व कांदे पिकांचे झाले. कोपरवेल, मोहरा, टाकळी, डोंगरगाव, आडगाव, आमदाबाद, सारोळा, जवखेडा आदी गावांतही फटका बसला. बहुलखेडा परिसरात रोहित्र कोसळले.

Crop Damage
Crop Damage In Nagar : नगरमध्ये गारपीट नुकसानीचा आकडा वाढतोय

नागापूर येथील खोलापूर शिवारात बाबू गुलामगोस यांच्या शेतातील पत्रे उडून गेले. टोमॅटो पिकाचे नुकसान झाले. पीरबावडा येथे आठवडी बाजारात भाजीपाला विक्रेत्यांचे मोठे नुकसान झाले.

देवळी येथे वीज अंगावर पडून एका बैलाचा मृत्यू झाला. तर एक बैल जखमी झाला. गंगापूर तालुक्यातील गोदावरी नदीकाठच्या कायगाव येथे हातातोंडाशी आलेले गहू, कांदा पीक डोळ्यांदेखत भिजले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com