Crop Damage : वादळी पाऊस, गारांचा खच, पिकांच्या नुकसानीत भर

शनिवारी दुपारनंतर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील काही जिल्ह्यांत मेघगर्जना, विजांसह, हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने दणका दिला.
Crop Damage
Crop DamageAgrowon

Pune Unseasonal Rain Update : राज्यातील वादळी पाऊस आणि गारपिटीचा (Hailstorm) तडाखा कायम असल्याने रब्बी पिके, भाजीपाला, फळ पीक नुकसानीत (Crop Damage) भरच पडत आहे.

शनिवारी दुपारनंतर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील काही जिल्ह्यांत मेघगर्जना, विजांसह, हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने (Heavy Rainfall) दणका दिला.

अनेक ठिकाणी गारांच्या अक्षरशः खच पाहायला मिळाला. सततच्या पावसाने शेतकरी हवालदिल झाला आहे.

नाशिक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा मोठा फटका असतानाच निफाड तालुक्यात शनिवारी (ता. १८) सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीने उत्तर व पश्चिम भागातील द्राक्ष बागांना मोठा तडाखा दिला आहे.

वीस मिनिटे झालेल्या जोरदार गारांच्या फटक्यात द्राक्षबागांसह उन्हाळ कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

तर देवळा तालुक्यातील दाहिवड परिसरात कांदा गहू पिकाचे नुकसान आहे. ऐन द्राक्ष काढणीच्या हंगामात झालेल्या नैसर्गिक कोपामुळे शेतकरी पूर्णतः उद्‌ध्वस्त झाला आहे.

Crop Damage
Crop Damage : अस्मानी संकटात पिकांची नासाडी

निफाड तालुक्यातील कुंभारी व पंचकेश्वर शिवारात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. या अस्मानी संकटाच्या फेऱ्यांमध्ये काढणीस आलेल्या द्राक्षबागा बाधित झाल्याने कोट्यवधी रुपयांचा फटका द्राक्ष उत्पादकांना बसला आहे.

विजांच्या कडकडाटासह गारपीट होऊन द्राक्षबागा व कांदा पिकांमध्ये अक्षरशः गारांचा खच साचला होता. यासह सोंगणीच्या अवस्थेत असलेला गहू आडवा झाला आहे. प्रामुख्याने कुंभारी, पंचकेश्वर, वनसगाव, खानगाव, खडकमाळेगाव, रानवडसह काही भागात हे नुकसान झाले आहे.

Crop Damage
Crop Damage : दोन जिल्ह्यांत १६ हजार ३५ हेक्टरवर नुकसान

वऱ्हाडातील तीनही जिल्ह्यांत सलग दुसऱ्या दिवशी वादळी पाऊस, गारपीट झाली. वादळामुळे गहू, हरभऱ्यासह संत्रा, कांदा, लिंबू व इतर पिकांचे नुकसान झाले.

शनिवारी (ता.१८) वाशीम जिल्ह्यात मंगरूळपीर, वाशीम, मालेगाव, रिसोड, मानोरा, कारंजा या सर्वच तालुक्यांमध्ये पावसाचा जोर होता.

मंगरूळपीर सह इतर तालुक्यात जोरदार गारपीटही झाली. बुलडाणा जिल्ह्यात चिखली, खामगाव, सिंदखेडराजा, मेहकर या तालुक्यांमध्ये पावसाने नुकसान केले. चिखली तालुक्यातील उदयनगर, वैरागडमध्ये जोरदार गारपीट झाली.

Crop Damage
Crop damage Compensation : नुकसानग्रस्तांना हेक्टरी २५ हजार मदत द्या

परभणी-हिंगोली जिल्ह्यातील अनेक मंडलांत शनिवारी (ता. १८) दुपारी तीननंतर आणि रात्री परभणी जिल्ह्यातील परभणी, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पालम, पूर्णा तालुक्यातील अनेक मंडलांत तसेच हिंगोली जिल्ह्यातील वसमत, औंढा नागनाथ, कळमनुरी, हिंगोली, सेनगाव तालुक्यातील अनेक मंडळांत हलका ते जोरदार पाऊस झाला.

वादळी वारे, गारपिटीमुळे ज्वारी, गव्हाची उभी पिके आडवी झाली. ज्वारीचा कडबा, हरभरा, हळद भिजली आहे. केळी, संत्रा, मोसंबी, चिकू आदी फळबागांचे नुकसान झाले. कांदा बीजोत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात शनिवारी (ता. १८) सायंकाळी वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. खोकर येथे गोठ्यावर वीज पडून एका शेतमजुरासह गायीचा मृत्यू झाला. तसेच एक महिला जखमी झाली. सायंकाळी नगर, पाथर्डी, संगमनेर तालुक्यात गारपीट झाली.

गारपिटीने गहू, हरभरा, मका आदी पिकांबरोबरच आंब्याचा मोहोर व लागलेली फळे गळून पडली. शेवगाव तालुक्यातील वाघोली परिसरात झालेल्या वादळी वारा व पावसामुळे रब्बीच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. काढणीस आलेली व मळणीच्या प्रतीक्षेत असलेली गहू, ज्वारी, हरभरा पिकाला फटका बसला.

रविवारी (ता. १९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस (स्रोत ः हवामान विभाग) :

मध्य महाराष्ट्र : नाशिक, श्रीरामपूर, जळगाव प्रत्येकी १०.

मराठवाडा : रेणापूर, उदगीर प्रत्येकी ३०, सोनपेठ, शिरूर कासार, सेलू, निलंगा, देगलूर, छत्रपती संभाजीनगर, देवणी, धालगाव प्रत्येकी १०.

विदर्भ : बल्लारपूर ५०, चिखलदरा, मूल, भामरागड प्रत्येकी ३०, सावळी, चंद्रपूर, धानोरा, दिग्रस, पोंम्बुर्णा, पुसद, सिरोंच्या, अर्जूनी मोरगाव, चामोर्शी, गडचिरोली, आमगाव प्रत्येकी २०.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com