
Maharashtra Rain Damage : मराठवाड्यात वादळी पावसाचा जोर अजूनही कायम आहे. बुधवारी (ता. ३) मध्यरात्रीनंतर व गुरुवारी (ता. ४) सकाळच्या सत्रात छत्रपती संभाजीनगरसह इतरही जिल्ह्यांतील काही ठिकाणी पाऊस बरसला. सततच्या पावसाने शेतकरी हैराण झाला आहे.
प्रशासनाच्या नोंदीनुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सरासरी ८.९ मिलिमीटर, जालना ३.६, बीड ०.८, लातूर १.५, धाराशिव ०.१, नांदेड ४.७, परभणी ३.५ तर हिंगोली जिल्ह्यात ५.५ मिलिमीटर पाऊस झाला. जालना जिल्ह्यातील मंठा व घनसावंगी शहरासह तालुक्यात अनेक ठिकाणी गुरुवारी (ता. ४) सकाळी जोरदार पाऊस झाला.
छत्रपती संभाजी नगर शहरासह परिसरात बुधवारी मध्यरात्रीनंतर पावसाला सुरुवात झाली. गुरुवारी पहाटे तीन वाजेपर्यंत पावसाचा जोर कायम होता.
जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील लोहगाव बालानगर, लातूर जिल्ह्यातील जळकोट शहर व तालुक्यात पुन्हा पाऊस झाला. त्यामुळे लग्नकार्यातील वऱ्हाडी मंडळींची धावपळ उडाली. गुरुवारी विद्युतपुरवठा खंडित झाला. ग्रामीण भागात वारा असल्यामुळे काही जनावरांच्या गोठ्यांवरील पत्रे उडाले.
गावरान आंबा गायब
जळकोट तालुक्यात पाच दिवसांपासून पाऊस दणका देत आहे. त्यामुळे शेती मशागतीच्या कामाचा खोळंबा झाला. वाऱ्यामुळे गावरान आंब्यांच्या झाडाचा आंबा गायब झाला आहे. शेतकरी अवकाळी पावसामुळे हैराण झाला आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.