Crop Loan : कर्जपुरवठ्याच्या उद्दिष्टाची अजूनही पूर्ती नाही

मराठवाड्यातील यंदाच्या खरीप हंगामासाठी आठही जिल्ह्यात ११३२८ कोटी ४२ लाख ८२ हजार रुपये कर्ज पुरवठ्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते.
Crop Loan
Crop LoanAgrowon

औरंगाबाद : वेळेत व पेरणीपूर्वी कर्ज कर्ज पुरवठा (Crop Loan Supply) करण्याचा प्रश्न पुन्हा एकदा बोलण्यापूरताच मर्यादित असल्याची स्थिती आहे. सप्टेंबरचा दुसरा आठवडा संपायला आला असताना मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात केवळ ७१.२१ टक्के कर्ज (Crop Loan) पुरवठ्याची उद्दिष्ट पूर्ती केली गेली आहे. (Agriculture Credit)

Crop Loan
Crop Loan : खानदेशात पीक कर्ज वितरण कमीच

मराठवाड्यातील यंदाच्या खरीप हंगामासाठी आठही जिल्ह्यात ११३२८ कोटी ४२ लाख ८२ हजार रुपये कर्ज पुरवठ्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. या उद्दिष्टाचा फाटला करताना सर्व बँकांनी मिळून ११ लाख ४० हजार ९४३ शेतकऱ्यांना ८ हजार ६७ कोटी ३२ लाख ८९ हजार रुपये कर्ज पुरवठा करत ७१.२१ टक्के उद्दिष्टपूर्ती केली. १२ सप्टेंबर अखेरपर्यंत करण्यात आलेल्या या कर्ज पुरवठ्यात औरंगाबाद जिल्हा आघाडीवर असून सर्वात कमी परभणी जिल्ह्यात कर्जपुरवठ्याची उद्दिष्टपूर्ती केली गेली आहे.

जिल्हानिहाय उद्दिष्ट, प्रत्यक्ष कर्जपुरवठा व टक्केवारी (रुपयांत)

जिल्हा औरंगाबाद

उद्दिष्ट १३५४ कोटी ५९ लाख १७ हजार

कर्जपुरवठा ११६१ कोटी १७ लाख ४३ हजार

शेतकरी १७६३९३

टक्केवारी ८५.७२

जिल्हा जालना

उद्दिष्ट १२१९ कोटी ८९ लाख १६ हजार

कर्जपुरवठा ८६० कोटी १२ लाख ३७ हजार

शेतकरी १२४५४६

टक्केवारी ७०.५१

जिल्हा परभणी

उद्दिष्ट १२०४ कोटी १५ लाख ३४ हजार

कर्जपुरवठा ६३९ कोटी ४१ लाख ३८ हजार

शेतकरी ८७४८७

टक्केवारी ५३.१०

जिल्हा हिंगोली

उद्दिष्ट ८४० कोटी

कर्जपुरवठा ५०४ कोटी ८८ लाख ९८ हजार

शेतकरी ७८८४७

टक्केवारी ६०.११

जिल्हा लातूर

उद्दिष्ट २००० कोटी

कर्जपुरवठा १४५१ कोटी २६ लाख ८२ हजार

शेतकरी २२९४५२

टक्केवारी ७२.५६

जिल्हा उस्मानाबाद

उद्दिष्ट १३६८ कोटी २० लाख

कर्जपुरवठा ८९९ कोटी ५२ लाख

शेतकरी १११३६४

टक्केवारी ६५.७४

जिल्हा बीड

उद्दिष्ट १७६० कोटी

कर्जपुरवठा १२८७ कोटी ४ लाख ९१ हजार

शेतकरी १६६५४०

टक्केवारी ७३.१३

जिल्हा नांदेड

उद्दिष्ट १५८१ कोटी ५९ लाख १५ हजार

कर्जपुरवठा १२६३ कोटी ८९ लाख

शेतकरी १६६३१४

टक्केवारी ७९.९१

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com