Crop Loan : खरिपात कर्जपुरवठ्याची उद्दिष्टपूर्ती नाहीच

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत यंदाच्या खरीप हंगामासाठी देण्यात आलेल्या कर्जपुरवठ्याच्या उद्दिष्टाची पूर्ती झालीच नसल्याचे खरीप पीककर्ज वाटपाच्या अंतिम अहवालावरून स्पष्ट झाले आहे.
Crop Loan
Crop LoanAgrowon

औरंगाबाद ः मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत यंदाच्या खरीप हंगामासाठी (Kharif Season) देण्यात आलेल्या कर्जपुरवठ्याच्या (Crop Loan Target) उद्दिष्टाची पूर्ती झालीच नसल्याचे खरीप पीककर्ज (Crop Loan) वाटपाच्या अंतिम अहवालावरून स्पष्ट झाले आहे.

Crop Loan
Crop Loan : ‘शिसाका’ चा प्रश्‍न रेंगाळलेलाच

यंदाच्या खरीप हंगामासाठी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांना ११३२८ कोटी ४२ लाख ८२ हजार रुपये कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. या उद्दिष्टाचा पाठलाग करताना आठही जिल्ह्यांत केवळ १३ लाख ९ हजार २०५ शेतकरी सभासदांना ९५९८ कोटी ४४ लाख ९१ हजार रुपये कर्जपुरवठा करत सर्वच जिल्ह्यांनी ८४.७३ टक्केच उद्दिष्ट पूर्ती केली. ही उद्दिष्ट पूर्ती करताना औरंगाबाद जिल्हा आघाडीवर तर परभणी जिल्हा पिछाडीवर राहिला.

Crop Loan
Crop Loan : रब्बीत पीककर्ज वाटपाला अद्याप प्रतीक्षा

नांदेड जिल्हा क्रमांक दोन वर, तर लातूर जिल्हा क्रमांक तीनवर राहिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा वेळेत व हंगामापूर्वी शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करण्याची शासनाची घोषणा यंदाच्या खरीप हंगामासाठी तरी करण्यापुरतीच मर्यादित राहिली आहे. एकीकडे खरीप पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.

दुसरीकडे शेतकऱ्यांना कर्जपुरवठाही वेळेत झाला नाही. त्यामुळे शासन वेळेत व हंगामापूर्वी शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करून त्यांची खासगी सावकारीच्या पाशातून मुक्तता करण्यासाठी कधी हालचाल करेल असा प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित होतो आहे.

जिल्हा, उद्दिष्ट, सभासद, कर्जपुरवठ व टक्केवारी

जिल्हा औरंगाबाद

उद्दिष्ट १३५४ कोटी ५९ लाख १७

सभासद १९०९६६

कर्जपुरवठा १३२९ कोटी ३८ लाख ८३

टक्केवारी ९८.१४

जिल्हा जालना

उद्दिष्ट १२१९ कोटी ८९ लाख १६

सभासद १३६३३४

कर्जपुरवठा ९७४ कोटी ७३ लाख ७३

टक्केवारी ७९.९०

जिल्हा परभणी

उद्दिष्ट १२०४ कोटी १५ लाख ३४

सभासद १०९०२१

कर्जपुरवठा ८३६ कोटी ३५ लाख २६

टक्केवारी ६९.४६

जिल्हा हिंगोली

उद्दिष्ट ८४० कोटी

सभासद ९० ४३७

कर्जपुरवठा ६०५ कोटी २६ लाख ७१

टक्केवारी ७२.०६

जिल्हा लातूर

उद्दिष्ट २००० कोटी

सभासद २७५६१९

कर्जपुरवठा १८१६ कोटी ९६ लाख ८३ हजार

टक्केवारी ९०.८५

जिल्हा उस्मानाबाद

उद्दिष्ट १३६८ कोटी २०लाख

सभासद १२६४३

कर्जपुरवठा १०६९ कोटी ५५ लाख ६३ हजार

टक्केवारी ७८.१७

जिल्हा बीड

उद्दिष्ट १७६० कोटी

सभासद १८५५९३

कर्जपुरवठा १४७३ कोटी ६७ लाख ७१

टक्केवारी ८३.७३

जिल्हा नांदेड

उद्दिष्ट १५८१ कोटी ५९ लाख १५ हजार

सभासद १९४७९२

कर्जपुरवठा १४९२ कोटी ५० लाख २१ हजार

टक्केवारी ९४.३७

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com