Crop Loan : मराठवाड्यात कर्जपुरवठा ६१ टक्क्यांवर

यंदाच्या खरीप हंगामासाठी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांसह, व्यापारी व ग्रामीण बँकेला ११ हजार ३२२ कोटी ३६ लाख ९८ हजार रुपये कर्जपुरवठ्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते.
Crop Loan
Crop LoanAgrowon

औरंगाबाद : मराठवाड्यात शेतीसाठी खरीप पीककर्ज पुरवठ्याला (Kahrif Crop Loan Supply) अजूनही गती मिळताना दिसत नाही. ऑगस्टचा दुसरा आठवडा जवळपास संपत आला तरी आठही जिल्ह्यांत उद्दिष्टाच्या तुलनेत केवळ ६१.४६ टक्के पीककर्ज (Crop Loan) पुरवठा झाला आहे.

Crop Loan
Crop Loan : पीककर्ज वाटपात कोल्हापूर जिल्हा बॅंक आघाडीवर

यंदाच्या खरीप हंगामासाठी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांसह, व्यापारी व ग्रामीण बँकेला ११ हजार ३२२ कोटी ३६ लाख ९८ हजार रुपये कर्जपुरवठ्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्या तुलनेत ८ ऑगस्ट अखेरपर्यंत विविध बँकांनी आठही जिल्ह्यांत १० लाख २९ हजार १४७ शेतकऱ्यांना ६९५८ कोटी २५ लाख ४४ हजार रुपये कर्जपुरवठा करत केवळ ६१.४६ टक्के उद्दिष्टपूर्ती केली आहे. कर्जपुरवठ्याची उद्दिष्टपूर्ती करताना नांदेड जिल्ह्याने सर्वाधिक कर्जपुरवठा केला असून, परभणी जिल्ह्यात सर्वात कमी कर्जपुरवठा झाला आहे. परभणी व हिंगोली जिल्ह्यांत उद्दिष्टाच्या ५० टक्केही कर्जपुरवठा झाला नाही हे विशेष.

जिल्हानिहाय उद्दिष्ट व प्रत्यक्ष कर्जपुरवठा

जिल्हा...औरंगाबाद

उद्दिष्ट...१३५४ कोटी ५९ लाख १७ हजार

कर्जपुरवठा...९१५ कोटी २० लाख ४६ हजार

शेतकरी...१५२४११

टक्केवारी...६६.५६

जिल्हा...जालना

उद्दिष्ट...१२१९ कोटी ८९ लाख १६ हजार

कर्जपुरवठा...७१६ कोटी ५७ लाख ३९ हजार

शेतकरी...१०९७६१

टक्केवारी...५८.७४

Crop Loan
Crop Loan : जिल्हा बँक, ग्रामीण बँकेची पीककर्ज वाटपाची उद्दिष्टपूर्ती

जिल्हा...परभणी

उद्दिष्ट...१२०४ कोटी १५ लाख ३४ हजार

कर्जपुरवठा...५५१ कोटी ८० लाख २३ हजार

शेतकरी....७८३३४

टक्केवारी...४५.८२

....

जिल्हा...हिंगोली

उद्दिष्ट...८३३ कोटी ९७ लाख १६ हजार

कर्जपुरवठा...४०६ कोटी ६२ लाख ८३ हजार

शेतकरी...६७२५२

टक्केवारी...४८.७६

...

जिल्हा...लातूर

उद्दिष्ट..२००० कोटी

कर्जपुरवठा...१३१६ कोटी ८१ लाख ९७ हजार

शेतकरी...२१६८६६

टक्केवारी...६५.८४

...

जिल्हा...उस्मानाबाद

उद्दिष्ट..१३६८ कोटी २० लाख

कर्जपुरवठा...७८५ कोटी ७३ लाख

शेतकरी...१०१०९२

टक्केवारी...५७.४३

जिल्हा...बीड

उद्दिष्ट..१७६० कोटी

कर्जपुरवठा...१०७५ कोटी ९७ लाख ५६ हजार

शेतकरी...१४५४७५

टक्केवारी...६१.१३

...

जिल्हा...नांदेड

उद्दिष्ट..१५८१ कोटी ५६ लाख १५ हजार

कर्जपुरवठा...११८९ कोटी ५२ लाख

शेतकरी....१५७९५६

टक्केवारी...७५.२१

४७ लाख २५ हजार हेक्टरवर पेरणी...

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी सर्वसाधारण क्षेत्र ४८ लाख ५७ हजार १५२ हेक्टर इतके आहे. त्या तुलनेत प्रत्यक्षात ४७ लाख २५ हजार ३५० हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे. जालना जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्रावर पेरणी झाली असून, परभणी व बीड जिल्ह्यांत मात्र सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत सात टक्के कमी क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com