Crop Loan : पीककर्ज उद्दिष्टपूर्ती अपूर्ण

यंदाच्या खरीप हंगामात परभणी जिल्ह्यातील बँकांना १ हजार २०४ कोटी १५ लाख रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट असताना प्रत्यक्षात १ लाख ९ हजार २१ शेतकऱ्यांना ८३६ कोटी ३५ लाख रुपये (६९.४६ टक्के) पीककर्ज वाटप झाले.
Crop Loan
Crop LoanAgrowon

परभणी ः यंदाच्या खरीप हंगामात (Khareep Season) परभणी जिल्ह्यातील बँकांना १ हजार २०४ कोटी १५ लाख रुपये पीककर्ज (Crop <Loan Parbhani) वाटपाचे उद्दिष्ट असताना प्रत्यक्षात १ लाख ९ हजार २१ शेतकऱ्यांना ८३६ कोटी ३५ लाख रुपये (६९.४६ टक्के) पीककर्ज वाटप झाले. यंदाच्या वाटपात नवीन पीककर्जाचे प्रमाण २२.९६ टक्के असून, नूतनीकरण केलेल्या कर्जाचे प्रमाण ७७.०३ टक्के आहे.

Crop Loan
Crop Damage : नुकसानग्रस्तांसाठी १३२ कोटी

जिल्हा सहकारी बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक यांनी उद्दिष्टापेक्षा जास्त कर्ज वाटप केले आहे. परंतु राष्ट्रीयीकृत तसेच खासगी बँकांनी हात आखडता घेतल्यामुळे यंदा सलग तिसऱ्या वर्षीही खरीप पीककर्ज वाटपाची उद्दिष्टपूर्ती होऊ शकलेली नाही.

Crop Loan
Crop Harvest : ‘पीककापणी’तून नाही ‘महसूल’ची सुटका

या वर्षी खरिपात राष्ट्रीयीकृत (व्यापारी) बॅंकांना ७६८ कोटी २४ लाख रुपये, खासगी बँका ९९ कोटी ६८ लाख रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बँक १८४ कोटी ६४ लाख रुपये, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक १५१ कोटी ५९ लाख रुपये एवढे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते.शुक्रवारी (ता. ३० सप्टेंबर) खरीप पीककर्ज वाटपाची मुदत संपली.

यंदा राष्ट्रीयीकृत बँकांनी ३५ हजार ७०२ शेतकऱ्यांना ३५१ कोटी ७८ लाख रुपये (४५.७९ टक्के), खासगी बँकांनी ३ हजार ५८२ शेतकऱ्यांना ३९ कोटी ७६ लाख रुपये (३९.८९ टक्के) पीककर्ज वितरित केले. महाराष्ट्र ग्रामीण बँकेने ३१ हजार ५४३ शेतकऱ्यांना २८६ कोटी ८९ लाख रुपये (१५५.३८ टक्के), जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ३८ हजार १९४ शेतकऱ्यांना १५७ कोटी ९२ लाख (१०४.१८ टक्के) पीककर्ज वाटप केले आहे.

नवीन पीककर्ज २२.९६ टक्के

यंदा सर्व बँकांनी मिळून एकूण २० हजार १३५ शेतकऱ्यांना १९२ कोटी ७ लाख रुपये एवढे नवीन पीककर्ज दिले. त्यात राष्ट्रीयीकृत बँकांनी ९ हजार ९७ शेतकऱ्यांना ८० कोटी ९४ लाख रुपये, खासगी बँकांनी ८८ शेतकऱ्यांना ९७ लाख रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बँकेने ८ हजार ८७९ शेतकऱ्यांना ८६ कोटी ६१ लाख रुपये पीककर्जाचा समावेश आहे.

यंदा एकूण ८८ हजार ८८६ शेतकऱ्यांनी ६४४ कोटी २८ लाख रुपयाच्या कर्जाचे नूतनीकरण करून घेतले आहे. त्यात राष्ट्रीयीकृत बँकांतर्गत २६ हजार ६०५ शेतकऱ्यांनी २७० कोटी ८४ लाख रुपये, खासगी बँकांच्या १ हजार ४२३ शेतकऱ्यांनी १५ कोटी २४ लाख रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या २२ हजार ६६४ शेतकऱ्यांनी २०० कोटी २८ लाख रुपये, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ३८ हजार १९४ शेतकऱ्यांनी १५७ कोटी ९२ रुपये कर्जाचा समावेश आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com