Rabi Sowing : सातबारावर होत नाही पीकपेऱ्याची नोंद

शेतकऱ्यांनी ई- पीक पाहणी केल्यानंतर जवळपास महिनाभर सातबारावर नोंदच होत नसल्याची तक्रार शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष दत्तात्रेय कदम यांनी जालन्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
Rabi Sowing
Rabi SowingAgrowon

E Peek Pahani जालना : शेतकऱ्यांनी ई- पीक पाहणी (E Peek Pahani) केल्यानंतर जवळपास महिनाभर सातबारावर नोंदच होत नसल्याची तक्रार शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष दत्तात्रेय कदम यांनी जालन्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. या प्रकरणी येत्या बुधवारी (ता.८) निषेध आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

Rabi Sowing
Rabi Sowing : रब्बीत एक लाखावर हेक्टरची ई-पीकपाहणी

कदम यांनी दिलेल्या निवेदनानुसार, शासनाच्या निर्देशाप्रमाणे शेतकऱ्याने रब्बी पिकांची ई-पिकपाहणी केली. त्यानंतर जवळपास एक महिना सातबारावर नोंद होत नसल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे.

या विषयी महसूल विभागाकडून कुठल्याही प्रकारची दखल घेत जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची सुविधा वेळेवर दिल्या जात नाहीत. वेळोवेळी निवेदने देऊन, सांगूनही प्रशासनाच्या कामकाजात फरक पडत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांत तीव्र संताप आहे.

Rabi Sowing
Rabi Sowing : रब्बी पेरणीपासून एक लाख ६४ हेक्टर क्षेत्र दूर

सर्व कार्यालये जिल्हा पातळीवर असल्याने शेतकऱ्यांची ठिकठिकाणी लूट होत आहे. एकीकडे कापसाला, सोयाबीनला भाव नाही, कर्जमाफी नाही, पीक कर्ज वेळेवर नाही, दुष्काळनिधी नाही, पीकविमा नाही.

सातबारासाठी ५० रुपये द्यावे लागतात. आदी समस्यांतून शेतकऱ्यांची लूट होत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. निवेदनाची प्रत जालना तहसीलदार यांनाही देण्यात आली आहे.

...अन्यथा बुधवारी आंदोलन

गांभीर्याने विचार करून शेतकऱ्यांच्या सातबारावर तत्काळ रब्बी पीक पेऱ्याची नोंद करावी. त्यामुळे त्यांचा हरभरा पीक वेळेवर विक्री होऊन त्यांचे नुकसान होणार नाही. हा प्रश्न वेळेत सोडविला नाही तर येत्या बुधवारी (ता.८) निषेध आंदोलन केले जाईल, असा इशारा कदम यांनी दिला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com