Crop Damage : चारच तास वीजपुरवठ्यामुळे पिके होरपळली

शेतीला चारच तास वीजपुरवठा होतो आहे. पिकांना पाणी द्यायचे तरी कसे? आम्ही शेती करावी की नाही? असा सवाल चांदवड तालुक्यातील शेतकऱ्यांना महावितरण कंपनीच्या कारभारामुळे पडला आहे.
Agriculture Electricity
Agriculture Electricity Agrowon

चांदवड, जि. नाशिक : शेतीला चारच तास वीजपुरवठा (Power Supply) होतो आहे. पिकांना पाणी द्यायचे तरी कसे? आम्ही शेती करावी की नाही? असा सवाल चांदवड तालुक्यातील शेतकऱ्यांना महावितरण (Mahavitaran) कंपनीच्या कारभारामुळे पडला आहे. विहिरीत पाणी असूनही विजेअभावी पिकांना पाणी देता येईना अशी परिस्थिती तालुक्यातील अनेक गावांत आहे.

Agriculture Electricity
Agriculture Electricity : बंद रोहित्र सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांचे ‘ठिय्या’

अगोदरच लोडशेडिंगमुळे फक्त आठच तास थ्री फेज वीजपुरवठा केला जातो. आता फक्त चारच तास वीजपुरवठा केला जातो आहे. अपुऱ्या वीजपुरवठ्यामुळे पिकांना पाणी देता येत नाही. डोळ्यांदेखत पिके होपळताना पाहावी लागत आहेत. अगोदर अतिवृष्टीमुळे पिके खराब झाली आहेत. त्यात आता दिवसा फक्त चारच वीजपुरवठा तोही सुरळीत नाही.

Agriculture Electricity
Agriculture Electricity : चंद्रपूर, गडचिरोली, गोंदियात शेतीला मिळणार दिवसा वीज

इतर वेळा सिंगल फेज पुरवठा तोही वेळेवर होत नाही. १३२ के.व्ही. सबस्टेशनच्या ओव्हरलोडमुळे आठ तास वीजपुरवठा होत नसल्याचे महावितरणचे अधिकारी सांगत आहेत. ओव्हरलोडमुळे घरगुती ग्राहकांनाही सुरळीत वीजपुरवठा होत नाही. बहुतांश वेळा ग्रामीण भागातील नागरिकांना रात्री अंधारातच रहावे लागते. महावितरण कंपनीने शेतीला व घरगुती ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

आम्हाला वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याने रात्री अंधारात रहावे लागते. आमच्या आदिवासी वस्तीत साप, विंचू, कुत्रे अशा प्राण्यांच्या भीतीतच आम्हाला रात्र काढावी लागते. वीजपुरवठा सुरळीत करावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल.
सुनील मारुती पिंपळे, निमोण
ओव्हरलोडमुळे १३२ के.व्ही. सबस्टेशनवरूनच ट्रिपिंग होत असल्यामुळे नाइलाजाने आम्हाला चार-चार तास वीजपुरवठा करावा लागतो.
उमेश पाटील, उपअभियंता, उपविभाग, चांदवड

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com