Rain : संततधारेमुळे कोवळी पिके पिवळी

परिसरात मागील महिनाभरापासून पावसाची संततधार सुरू आहे. बहुतांश क्षेत्र पाण्याखाली आहे. परिणामी, रानातील कोवळी पिके पिवळी पडू लागली आहेत.
Crop Damage
Crop DamageAgrowon

उजनी, जि. लातूर : परिसरात मागील महिनाभरापासून पावसाची संततधार (Rainfall) सुरू आहे. बहुतांश क्षेत्र पाण्याखाली आहे. परिणामी, रानातील कोवळी पिके पिवळी (Crop Damage) पडू लागली आहेत. दरम्यान, एका मागोमाग एक संकटाचा सामना करीत ही पिके वाचविण्याचे परिसरातील शेतकऱ्यांपुढे आव्हान आहे. (Crop Damage Due To Rain)

Crop Damage
Soybean: सोयाबीनवर पिवळा मोझॅक रोग पडलाय का ?

यंदा उजनी (ता. औसा) परिसरात ८ जुलै ते २५ जुलैदरम्यान पेरणी झाली आहे. सर्वाधिक सोयाबीन पिकाची पेरणी झाली असून, सध्या पिके कोवळ्या अवस्थेत आहेत. या अवस्थेत जास्तीचा पाऊस सहन करण्याची अद्याप या पिकांची क्षमता नाही. परंतु या परिसरात सतत पावसाची संततधार, ढगाळ वातावरण आदी मुळे येलो मोझ्याक रोगसदृश परिस्थिती पाहायला मिळत आहे. कोवळी पिके पिवळी पडू लागली आहेत. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.

Crop Damage
Soybean : देशात ४० लाख टन सोयाबीन शिल्लक?

यंदा शेतकऱ्यांना चोहोबाजूंनी विविध संकटानी घेराव घातला आहे. यामुळे शेतकरी मानसिकदृष्ट्या पूर्णतः खचला आहे. आकाशात पावसाचे आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे ढग दाटून येत आहेत. त्यासोबतच पिकांमध्ये गवताचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. सततच्या पावसामुळे जमिनीतील पाण्याचा वापसा होत नसल्यामुळे पिकांतील आंतरमशागतीचे कामे करण्यास ही विलंब होत आहे.

परिणामी, पिकांच्या वाढीचा वेग मंदावला आहे. दरम्यान सद्यपरिस्थितीत पिकांना वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असून यामुळे उत्पादन खर्चात मोठी वाढ होत आहे. दरम्यान अशा विविध संकटांना तोंड देत पिकांना वाचविण्याचे शेतकऱ्यांपुढे आव्हान आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com