Crop Damage : समृद्धी महामार्गावरील पाणी शेतात; पिकांचे नुकसान

आहे. यंदाच्या खरीप हंगामात पिके जोमात उभी असताना समृद्धी महामार्गाच्या दुतर्फा असणाऱ्या शेतांमध्ये महामार्गावरून वाहत येणारे पाणी साचत असल्याने या पिकांचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे.
Crop Damage
Crop DamageAgowon

सिन्नर, जि. नाशिक : महाराष्ट्र राज्याच्या समृद्धीचा राजमार्ग (Samrudhhi Highway) म्हणून ओळख मिरवणारा समृद्धी महामार्ग शेतकऱ्यांसाठी मात्र नुकसानकारक ठरू पाहत आहे. यंदाच्या खरीप हंगामात पिके (Kharif Crop) जोमात उभी असताना समृद्धी महामार्गाच्या दुतर्फा असणाऱ्या शेतांमध्ये महामार्गावरून वाहत येणारे पाणी साचत (water entering fields from Samriddhi Highway) असल्याने या पिकांचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांकडून याबाबत संबंधित ठेकेदार कंपनी व अधिकाऱ्यांना वारंवार विनवण्या करूनही दुर्लक्ष होत असल्याने सिन्नर तालुक्यातील वावी येथील शेतकऱ्यांनी सहकुटुंब उपोषणास बसण्याचा इशारा दिला. त्यानंतर प्रशासनाला जाग आली आणि तात्पुरती मलमपट्टी करून शेतांत पाणी जाणार नाही यासाठी चर खोदण्यात आले.

Crop Damage
Crop Damage: ओला दुष्काळ जाहीर करा: स्वाभिमानी शेतकरी संघटना

भविष्यात समृद्धी महामार्गावरून पावसाचे पाणी शेतांमध्ये येऊ नये यासाठी प्रभावी उपाययोजना करावी, अशी मागणी वावी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. आवर्षणाचा सामना करणाऱ्या या भागात यंदा खरीप हंगाम आशादायक होईल, असे चित्र आहे; मात्र समृद्धी महामार्गालगत दोन्ही बाजूंच्या शेतांमध्ये महामार्गावरून वाहत येणारे पावसाचे पाणी साचून उभी पिके पाण्याखाली जात असल्याने व शेतात साचणाऱ्या पाण्याचा निचरा होणारी व्यवस्था नसल्याने नुकसान सहन करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

Crop Damage
Crop Damage : पिकातील अतिरीक्त पाण्याचा निचरा कसा कराल ?

वावी येथे गेल्या दोन महिन्यांपासून शेतकरी या संकटाचा सामना करत आहेत; मात्र पॅकेज-१२ अंतर्गत काम करणाऱ्या दिलीप बिल्डकॉन या कंपनीच्या अधिकाऱ्यांची मुजोरी आणि रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांचे होणारे दुर्लक्ष शेतकऱ्यांच्या संतापात भर घालणारे ठरू लागले आहे. संतप्त शेतकऱ्यांनी दिलीप बिल्डकॉनच्या वावी येथील कॅम्पसमोर सहकुटुंब उपोषणास बसण्याची तयारी केल्यावर धास्तावलेल्या प्रशासनाने तातडीने उपाययोजना करत संबंधित शेतकऱ्यांच्या शेतात समृद्धी महामार्गावरून वाहत येणारे पावसाचे पाणी जाणार नाही यासाठी चर खोदून देत शेतकऱ्यांना आंदोलनापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला.

‘त्या’ शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या मुंबई येथील मुख्य कार्यालयात वावी येथील शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रासाबाबत व संभाव्य उपोषण आंदोलनाबाबत सूचीत करण्यात आले. त्यानंतर समृद्धीच्या कामावर नियंत्रण करणाऱ्या नाशिक येथील कार्यकारी अभियंत्यांसह दिलीप बिल्डकॉनच्या अधिकाऱ्यांचे कान टोचण्यात आले. समृद्धीमुळे शेतकरी व स्थानिक ग्रामस्थांना अडचणी निर्माण होणार नाहीत, यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात. स्थानिक नागरिकांना विश्‍वासात घेऊन कामे करावीत अशी सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आली. त्यानंतर तातडीने जेसीबी व यंत्रे पाठवून वावी येथील ‘त्या’ शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com