Rainy Weather : पावसाळी वातावरणाने पिके संकटात
जळगाव ः खानदेशात मागील चार दिवसांपासून ढगाळ वातावरण (Cloudy Weather) आहे. कलिंगडासह भाजीपाला (Crop Damage) पिकांची अंशतः हानी रोगराईने होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना पिकावर फवारण्या घ्याव्या लागत आहेत.
नोव्हेंबर व डिसेबरमध्ये मिळून ३० ते ३५ दिवस ढगाळ, पावसाळी वातावरण (Rainy Weather) होते. या महिन्यात सुमारे २० ते २२ दिवस निरभ्र, कोरडे वातावरण (Dry Weather) होते.
परंतु मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार झाले आहे. वेलवर्गीय पिकांची म्हणजेच कलिंगड, गिलके, कारली, खरबूज आदी पिकांची हानी होईल, असे दिसत आहे.
चार ते पाच दिवस आर्द्रता अधिक राहीली. यामुळे शेतकऱ्यांनी बुरशीनाशके, किडनाशके व संप्रेरकांची फवारणी घेण्यास सुरवात केली आहे. ढगाळ वातावरणामुळे थंडी गायब झाली आहे.
किमान तापमान १६ अंश सेल्सीअसवर आहे. मध्यंतरी थंडी होती. आता दिवसा व सायंकाळी उकाडा, उष्णता जाणवत आहे. अशीच स्थिती नोव्हेंबर व डिसेंबरमध्येही तयार झाली होती.
त्या वेळेस हरभरा पिकावर बुरशीजन्य रोगही आले होते. त्यात नुकसान झाले. या महिन्यात अनेक दिवस थंड वातावरण राहीले.
मागील आठवड्यात मंगळवारी (ता.२४) ढगाळ वातावरण तयार झाले. पाऊस कुठेही झालेला नाही. परंतु मध्येच सुसाट वारा सुटतो. सायंकाळी उकाडा असतो.
तर मध्यरात्री थंड वारे येतात. सकाळी १० ते ११ पर्यंत उष्णता जाणवत नाही. परंतु दुपारी उष्णता असते. अधूनमधून सूर्यदर्शन होत आहे. कोरडवाहू हरभरा मळणीवर आहे.
काही भागात मळणी सुरू आहे. तर काही भागात कापणी करून हरभरा मळणीचे नियोजन झाले आहे. आता पाऊस आल्यास हरभऱ्याचे मोठे नुकसान होईल.
तसेच इतर पिकांचीही हानी शक्य आहे. पपईची काढणी रखडत सुरू आहे. काही शेतकरी काढणी करून घेत आहेत. कारण पाऊस आल्यास शेतमालाचे दर कमी होऊन नुकसान होते.
अनेक शेतकऱ्यांच्या कलिंगड पिकात कलिंगड पक्व होत आहेत. तसेच काही शेतकऱ्यांच्या कलिंगड पिकाची लागवड मागील २० ते २५ दिवसात झाली आहे. या पिकांच्या वाढीसाठी कोरडे वातावरण हवे आहे.
केळी पिकांस अनुकूल वातावरण...
केळी हवी तेवढी काढणीवर नाही. कांदेबाग केळीची वाढ मात्र बरी आहे. या केळीला आर्द्रतायुक्त वातावरणाची गरज होती. कारण थंडीमुळे करपा रोग केळीवर वाढला होता.
किमान तापमान १५ अंश सेल्सिअसवर असल्याने केळी पिकातील करपा रोगासंबंधीची समस्या कमी होऊन पीक वाढण्यास अनुकूल वातावरण राहील, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.