दौंड तालुक्यातील पिके आवर्तनाअभावी धोक्यात

जानाई- शिरसाई योजनेच्या पाण्याला नियमितता नसल्याचा फटका
दौंड तालुक्यातील पिके आवर्तनाअभावी धोक्यात
WaterAgrowon

यवत, ता. दौंड ः तालुक्यातील मागील अनेक वर्षांपासून दुष्काळाशी (Drought) सामना करीत आलेल्या खोर गावाला मागील वर्षीपासून जानाई- शिरसाई योजनेतून (Janai Sirsai Scheme) पाणी देण्यास सुरुवात झाली. मात्र, या पाण्याच्या आवर्तनांना (Water Cycle) नियमितता नसल्याने त्याचा मोठा फटका येथील शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.

मागील वर्षीपासून खोर गावाला जनाई- शिरसाई योजनेतून पाणी देण्यास सुरुवात झाली. एक-दोन आवर्तने सुरुवातीला मिळाली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण होते. तरकारी, कांदा, ज्वारी, बाजरी, कडधान्ये आणि मुख्य म्हणजे अंजीर अशी पिके येथे घेतली जात होती. त्यासाठी आपापल्या परीने पाण्याचे व हंगामाचे नियोजन केले जात असे. जनाईच्या पाण्यामुळे काही शेतकऱ्यांनी उसाचेही नियोजन केले. मात्र सध्या पाऊस लांबलेला असून, त्यात आवर्तनाचे पाणीही नाही. त्यामुळे येथील अंजीर उत्पादकांपासून ऊस उत्पादकापर्यंत सारेच शेतकरी हवालदील झाले आहेत. पिंपळाची वाडी परिसरात तर ऐन पावसाळ्यात उसाचे उभे पीक वाळत असताना पाहावयाची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

‘तीनऐवजी एकच पंप सुरू’

पावसाने ओढ दिल्याने नवा मुठा उजव्या कालव्याचे पाणी इंदापूरसाठी दिले जात आहे. जनाई-सिरसाई उपसा सिंचन योजना ज्या वरवंड तलावावर आहे. त्यात पुरेसे पाणी सोडता येत नाही. त्यामुळे या योजनेचे तीनऐवजी एकच पंप सुरू असल्याने पुरेशा क्षमतेने पाणी येत नाही. त्यामुळे खोर गावाला पुरेसे पाणी मिळत नाही, असे खोरच्या सरपंच वैशाली अडसूळ यांनी सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com