यवतमाळ जिल्ह्यात ७० हजार हेक्टरवरील पिके पाण्यात

गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने शेतकर्‍यांना पुन्हा झटका दिला आहे. या पावसाने जिल्ह्यातील ७० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.
Crop Damage
Crop DamageAgrowon

यवतमाळ : जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टी (Heavy Rain) व पुरामुळे (Flood) तब्बल पावणेतीन लाख हेक्टरवरील शेतपिकांचे (Crop Damage) नुकसान झाले आहे. यानंतर गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने शेतकर्‍यांना पुन्हा झटका दिला आहे. या पावसाने जिल्ह्यातील ७० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने (Agriculture Department) वर्तविला आहे.

Crop Damage
Soybean Rate : सोयाबीनला यंदाही चांगला दर मिळणार

जिल्ह्यात जुलै महिन्यात १५ दिवस संततधार पाऊस होता. काही तालुक्यांत अतिवृष्टी झाली. अतिवृष्टी व पुरामुळे पावणेतीन लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरील हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. तीन लाख शेतकर्‍यांना पावसाचा फटका बसला आहे. त्यांना २०५ कोटी रूपयांच्या नुकसानभरपाईची गरज आहे. अद्याप जुलै महिन्यातील नुकसानाचा अहवाल शासन दरबारी पोहोचत नाही, तोच पावसाने पुन्हा एकदा शेतकर्‍यांना झटका दिला आहे. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने नदी, नाल्यांना पूर आले. त्यामुळे ७० हजार हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. अजूनही अनेक शेतांत पाणीच पाणी असल्याने नुकसानाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. नैसर्गिक संकटामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. पाऊस तसेच पुरामुळे कापूस, सोयाबीन पिकांचे नुकसान मोठे आहे. शेतकरी आधीच संकटात आहे. त्यातच पावसाने पुन्हा एकदा शेतकर्‍यांना मोठा फटका दिला आहे. जुलै महिन्यात तीन लाख हेक्टरवरील पिके बाधीत झाली असून या पावसाने ७० हजार हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे.

Crop Damage
Crop Damage : समृद्धी महामार्गावरील पाणी शेतात; पिकांचे नुकसान

५० टक्के क्षेत्राला फटका

खरीप हंगामात यंदा नऊ लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. यातील जवळपास ५० टक्के क्षेत्र अतिवृष्टी तसेच पुराच्या पाण्यामुळे बाधीत झाले आहे. शेतकर्‍यांच्या महत्त्वाच्या हंगामातील ५० टक्के भागावरील पिक उद्ध्वस्त झाले आहे. त्यामुळे या हंगामात शेतकर्‍यांना मोठा नुकसानीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

पावसामुळे ७० हजार हेक्टरवरील पिकांना फटका बसण्याचा प्राथमिक अहवाल आहे. कर्मचार्‍यांना पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर किती क्षेत्र बाधीत झाले याची वस्तुस्थिती समोर येणार आहे.

-नवनाथ कोळपकर, जिल्हा कृषी अधिक्षक

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com