Crop Damage : उन्हामुळे कातळावरील शेती करपण्यास सुरुवात

उन्हामुळे कातळावरील शेती करपू लागली आहे. काही ठिकाणी करप्याचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्‍यांच्या तोंडचे पाणी पळू लागले आहे.
Crop Damage
Crop DamageAgrowon

रत्नागिरी ः खरिपाचा हंगाम (Kharif Season) यंदा आठवडाभर उशिराने सुरू झाला. तरीही जून-जुलै-ऑगस्टमध्ये पडलेल्या समाधानकारक पावसाच्या (Rainfall) जोरावर भात (Paddy Cultivation) आणि नागली पीक लावणीची (Nagali Crop Cultivation) कामे शेतकऱ्यांनी व्यवस्थित उरकली; मात्र गेल्या आठवडाभरात ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे. उन्हामुळे (Heat) कातळावरील शेती करपू (Crop Burn) लागली आहे. काही ठिकाणी करप्याचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्‍यांच्या तोंडचे पाणी पळू लागले आहे.

Crop Damage
Crop Damage : वादळी पावसाने पिके आडवी

जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाचे आगमन झाले. त्यानंतर जिल्ह्यात खरिपाच्या कामांना प्रारंभ झाला. त्यामुळे पेरण्यांची कामे उशिराने सुरू झाली. जिल्ह्यात भात पिकाखाली ६७ हजार हेक्टर, तर अन्य पिकांसाठी १० हजार हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे. जिल्ह्यात सध्या ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे. सप्टेंबर महिन्यात ऑक्टोबर हीटची जाणीव होत आहे. दिवसातून एखादी सर पडते, पण तीही तुरळक असल्यामुळे त्याचा फायदा भातशेतीला म्हणावा तसा होत नाही. भातशेती बहरली आहे. काही भागांत भातपिके पसवण्यासही प्रारंभ झाला आहे. पावसाने दडी मारल्यामुळे शेतीला फटका बसण्याची शेतकऱ्यांना भीती आहे.

गेल्या आठवडाभरापासून पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिलेले आहे. उन्हामुळे भातपिकांवर परिणाम लक्षात घेता शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी. ज्या ठिकाणी पाणी उपलब्ध आहे, अशा ठिकाणी शेतांना पाणी देण्याची व्यवस्था करावी. पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येताच तातडीने कीटकनाशकांचा अवलंब करावा.
विनोद हेगडे, कृषी अधिकारी
ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस पावसाअभावी करपा पडण्याची शक्यता होती; मात्र पाऊस पडला आणि दिलासा मिळाला. आता पुन्हा तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. दिवसातून एखादी पावसाची सर भातशेतीला लागते. भाताला पोटरी येण्याची ही वेळ असल्यामुळे या कालावधीत पुरेसे पाणी आवश्यक आहे.
संतोष भडवळकर, शेतकरी

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com