Crop Damage : बारामती तालुक्यात पिकांचे ३७४५ हेक्टरवर नुकसान

परतीच्या पावसाने पुणे जिल्ह्यासह बारामती तालुक्यात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. तालुक्यात या पावसाने तब्बल ३ हजार ७४५ हेक्टरवरील उभ्या पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी सुप्रिया बांदल यांनी दिली.
Crop Damage
Crop DamageAgrowon

बारामती, जि. पुणे : परतीच्या पावसाने पुणे जिल्ह्यासह बारामती (Heavy Rain Baramati) तालुक्यात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. तालुक्यात या पावसाने तब्बल ३ हजार ७४५ हेक्टरवरील उभ्या पिकांचे नुकसान (Crop Damage) झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी सुप्रिया बांदल (Supriya Bandal) यांनी दिली.

Crop Damage
Crop Damage : आठवडाभरात ५० हजार हेक्टर सोयाबीनवर पाणी

गेल्या काही दिवसांत बारामती तालुक्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. जिरायती भागातही अनेकदा एकाच दिवसात ६५ मिलिमीटरहून अधिक पाऊस नोंदविला गेला. एकाच महिन्यात किंवा एकाच आठवड्यात अचानकच पाऊस पडल्याने नुकसानीची तीव्रता अधिक आहे.

Crop Damage
Crop Damage : परतीच्या पावसाचा जोरदार तडाखा

बारामती तालुक्याची पावसाची सरासरी ३८९ मिलिमीटर इतकी आहे, अनेक ठिकाणी या सरासरीच्या तिप्पट पावसाची नोंद झाली आहे. पावसाळ्यात व आता परतीच्या पावसानेही बारामतीत जोरदार हजेरी लावली. दरम्यान, दोन दिवसांत झालेल्या अतिवृष्टीनंतर बारामती तालुक्यात कृषी विभागाने केलेल्या पाहणीत प्राथमिक अंदाजानुसार ३ हजार ७४५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

बारामती तालुक्यात खरिपाचे (उसाचे क्षेत्र पकडून) २७ हजार १११ हेक्टर तर रब्बीचे १३ हजार ९०० हेक्टर क्षेत्र आहे. हे क्षेत्र मका, ज्वारी व सूर्यफूल आदी पिकांखाली आहे. मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सध्या कृषी विभागाकडून ज्या शेतातील पाणी ओसरू लागले आहे अशा ठिकाणी पंचनामे सुरू केले असून, जेथे पाणी आहे तेथे पाणी ओसरल्यानंतर पंचनामे केले जाणार आहेत.

कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार बारामती तालुक्यात कांदा व इतर भाजीपाला पिकांचे दीड हजार हेक्टर, सोयाबीन ६५०, ज्वारी ६५०, बाजरी ५००, सूर्यफूल १०८ चारा पिके ५० तर उसाचे ३७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. हा प्राथमिक अंदाज असून यात आणखी वाढ होण्याचीही शक्यता आहे. अनेक ठिकाणी पाणीच असल्याने अद्याप अंदाज घेणेही काही ठिकाणी अवघड आहे, असेही सूत्रांचे म्हणणे आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com