Sugarcane Crushing : नांदेड विभागातील १७ कारखान्यांना गाळप परवाना

चार जिल्ह्यांतील ३० कारखान्यांकडून ऑनलाइन अर्ज
 Sugarcane Crushing
Sugarcane Crushing Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
नांदेड : प्रादेशिक सहसंचालक (साखर) नांदेड, विभागांतर्गत चार जिल्ह्यांतून गाळप परवान्यासाठी (Crushing Licence) ३० ऑनलाइन प्रस्ताव दाखल झाले आहेत. यापैकी आजअखेर १७ कारखान्यांना राज्याच्या साखर आयुक्तांकडून गाळप परवाना (Sugarcane Crushing) मिळाला आहे. गाळप हंगाम सुरू होऊनही अनेक कारखान्यांना नियमाची पूर्तता केली नसल्यामुळे गाळप परवाना लांबल्याची माहिती सूत्राने दिली

 Sugarcane Crushing
सोलापूर जिल्ह्यातील २४ कारखान्यांना गाळप परवाना

राज्यात गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू झाला आहे. या हंगामासाठी नांदेड विभागातील ३० साखर कारखान्यांनी नांदेड प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयामार्फत राज्याच्या साखर आयुक्तांकडे गाळपासाठी ऑनलाइन प्रस्ताव सादर केले आहेत. यात २१ खासगी, तर नऊ सहकारी साखर कारखान्याचा समावेश आहे. गाळपासाठी परभणी जिल्ह्यातील रेणुका शुगर देवनांद्रा, श्री लक्ष्मी नृसिंह शुगर अमडापूर, योगेश्‍वरी शुगर लिंबा, गंगाखेड शुगर माकणी, ट्वेन्टिवन शुगर सायखेडा, बळीराजा कानडखेड. श्री तुळजा भवानी, जिंतूर. हिंगोली जिल्ह्यांतून भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना डोंगरकडा, पूर्णा सहकारी साखर कारखाना वसमत, शिऊर साखर कारखाना वाकोडी. कपिश्‍वर शुगर अँड केमिकल लिमिटेड, जवळा बाजार. टोकाई सहकारी साखर कारखाना कुरुंदा.

नांदेड जिल्ह्यातून भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना देगाव, सुभाष शुगर हडसणी, शिवाजी सर्व्हिस स्टेशन बाऱ्हाळी, कुंटूरकर शुगर कुंटूर, व्यंकटेश्‍वरा ॲग्रो शुगर शिवणी. एमव्हीके ॲग्रो फूड प्रॉडक्ट, वाघलवाडा. तर, लातूर जिल्ह्यातून विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखाना चिंलोलीराव वाडी, विलास सहकारी साखर कारखाना निवळी, विलास सहकारी साखर कारखाना तोंडार, रेणा सहकारी साखर कारखाना निवडा, शिवाजीराव पाटील निलंगेकर साखर कारखाना, सिद्धी शुगर उजना, जागृती शुगर तळेगाव, ट्वेन्टिवन शुगर्स माळवटी.

 Sugarcane Crushing
Sugarcane Season : तेरा कारखान्यांना गाळप परवाने

पन्नगेश्‍वर शुगर मिल्स पानगाव (ता. रेणापूर), संत शिरोमणी मारोती महाराज सहकारी साखर कारखाना बेलकुड (ता. ओसा) व श्री साईबाबा शुगर लि. शिवणी (ता. ओसा) अशा तीस कारखान्यांनी प्रस्ताव सादर केले आहेत. यापैकी १७ कारखान्यांना आजपर्यंत गाळप परवाना मिळाला आहे. गाळप हंगाम सुरू होऊन पंधरा दिवसाचा अवधी लोटला तरी अनेक कारखान्यांनी शेतकऱ्यांची संपूर्ण देणी दिली नसल्याने गाळप परवाने रखडले आहेत.  

गाळप परवाना मिळालेले १७ कारखाने
श्री रेणुका शुगर लि., देवनांद्रा, ता. पाथरी, योगेश्‍वरी शुगर इंडस्ट्रीज लि., लिंबा, ता. पाथरी, गंगाखेड शुगर ॲण्ड एनर्जी लि., माखणी, ता. गंगाखेड, ट्वेन्टिवन शुगर लि. लि., उत्तमनगर, सायखेडा, ता. सोनपेठ, पूर्णा सहकारी साखर कारखाना, वसमतनगर, ता. वसमतनगर, शिऊर साखर कारखाना प्रा. लि., वाकोडी, ता. कळमनुरी, श्री सुभाष शुगर प्रा. लि., हदगाव, ता. हदगाव, कुंटुरकर शुगर ॲण्ड अँग्रो प्रा. लि., कुंटूर, ता. नायगाव, धाराशीव शुगर लि., शिवणी (जामगा), ता. लोहा, जि. नांदेड, विलास सहकारी साखर कारखाना लि., तोंडार, ता. उदगीर, श्री. साईबाबा शुगर्स लि., शिवणी ता. औसा, ट्वेन्टिवन शुगर्स लि., माळवटी, ता. लातूर, तुळजाभवानी शुगर प्रा. लि., परभणी, विलास सहकारी साखर कारखाना यु. एक ली., निवळी, ता. लातूर, पन्नगेश्‍वर शुगर ॲण्ड अलाइड इंड., पानगाव, ता. रेणापूर, जि. लातूर, सिद्धी शुगर ॲण्ड अलाइड इंड., उजनी, ता. अहमदपूर, जि. लातूर, शिवाजी सर्व्हिस स्टेशन, बाऱ्हाळी, ता. मुखेड, जि. नांदेड

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com